मलकापूर, दि. २६ (प्रतिनिधी):
“हिंदू म्हणजे जो जाती-पातीच्या पलीकडे विचार करतो, भारतीय संस्कृतीचे पालन करतो, भारतभूमीला माता मानतो आणि देशातील सर्व धरोहर व थोर पुरुषांविषयी आदर बाळगतो, तो हिंदू होय,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चे विदर्भ प्रांत सहप्रचारक परीक्षित जावडे यांनी केले.
सामाजिक समरसता निर्माण होऊन हिंदू समाजाचे एकत्रीकरण व्हावे तसेच समाजाभिमुख विचार प्रस्थापित व्हावेत या उद्देशाने श्रीराम वस्ती, नवा मोहल्ला, छोटा गुरुद्वारा येथे २४ फेब्रुवारी रोजी हिंदू संमेलन पार पडले. या कार्यक्रमास पंडित गोपालकृष्ण पाराशर (धुंधडकावाले, उज्जैन) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. महिला वक्त्या म्हणून दुर्गा वाहिनीच्या सहसंयोजिका पायल राजपूत उपस्थित होत्या. छोटा गुरुद्वाराचे विश्वस्त मदन चोपडा यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात गोमाता पूजन तसेच गुरु नानक आणि भारत माता यांच्या प्रतिमांच्या पूजनाने झाली. सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत दुर्गा वाहिनीच्या मुलींनी ‘नारी शक्ती’ या विषयावर आधारित ‘द्रौपदी वस्त्रहरण’ प्रसंगावरील नाटिका सादर केली.
पायल राजपूत यांनी महिला सशक्तीकरण व आत्मनिर्भरतेविषयी मार्गदर्शन करताना, आजच्या स्त्रीला संधी दिल्यास ती आकाशालाही गवसणी घालू शकते, असे सांगितले. पंडित गोपालकृष्ण पाराशर महाराज यांनी हिंदू समाज एकत्र दिसत असला तरी निर्णायक क्षणी एकजूट राहात नाही, असे मत व्यक्त केले आणि गीता, गंगा व गाय यांच्या रक्षणासाठी प्रयत्नांची गरज अधोरेखित केली.
परीक्षित जावडे यांनी ‘सर्वे भवन्तु सुखिनः’ या मंत्रातून हिंदू संस्कृतीचे व्यापक दर्शन घडते, असे नमूद केले. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण, स्वबोध व स्वदेशीचा स्वीकार तसेच नागरिकांची मूलभूत कर्तव्ये या पंचसूत्री संकल्पनांचे महत्त्व त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले.
जो भारतभूमीला माता मानतो, तो हिंदू’ — परीक्षित जावडे
0
9
4
6
2
0
Users Today : 34
Leave a comment