शेंदुर्जन (प्रतिनिधी):
शेतकऱ्यांचा मुख्य जोडधंदा असलेल्या पशुधनाचे आरोग्य जपण्यासाठी तसेच दुग्धोत्पादनात वाढ व्हावी या उद्देशाने केंद्र व राज्य शासनामार्फत ‘लाळ्या-खुरकुत’ (Foot and Mouth Disease) रोग नियंत्रण व निर्मूलन मोहीम हाती घेण्यात आली आहे. शेंदुर्जन पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्गत येणाऱ्या विविध गावांमध्ये या लसीकरण मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे.
पशुधनाचे आरोग्य अबाधित राखणे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दुग्ध व मांस व्यवसाय सुलभ होण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. पशुधन पर्यवेक्षक विशाल बाजीराव आंधळे यांनी सर्व पशुपालकांना या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.
लाळ्या-खुरकुत हा विषाणूजन्य संसर्गजन्य आजार असून, त्याचा परिणाम जनावरांच्या उत्पादकतेवर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेणे पशुधनाच्या सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहे.
लसीकरण मोहिमेचे वेळापत्रक:
२५ फेब्रुवारी: दरेगाव (बसस्टॉप)
२६ फेब्रुवारी: नागझरी (मराठी शाळा / बसस्टॉप)
२७ फेब्रुवारी: लिंगा (जि.प. शाळेसमोर / बसस्टॉप)
२८ फेब्रुवारी: साधापूर (जि.प. शाळेसमोर / बसस्टॉप)
२ मार्च: हनवत खेड (मंदिरासमोर / बसस्टॉप)
५ मार्च: हिवरा (गडलींग) (जि.प. शाळेसमोर / तांडा वस्ती)
७ मार्च: राजेगाव (ग्रामपंचायत समोर / बसस्टॉप)
९ मार्च: शेंदुर्जन (पशुवैद्यकीय दवाखाना)
१० मार्च: बाळ समुद्र (जि.प. शाळा)
११ मार्च: कंडारी (बसस्टॉप)
सर्व पशुपालकांनी ठरलेल्या ठिकाणी व वेळेत जनावरे आणून लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पशुवैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे.
लाळ्या-खुरकुत’ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ
0
9
4
6
2
0
Users Today : 34
Leave a comment