आयसीआय क्लासेस चे ‘जेईई’मध्ये उल्लेखनीय यश

KHOZ MASTER
1 Min Read

देऊळगाव राजा (प्रतिनिधी):
देऊळगाव राजा येथील आयसीआय क्लासेसमधील विद्यार्थ्यांनी यंदाच्या Joint Entrance Examination (जेईई) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. ग्रामीण भागातून स्पर्धा परीक्षेत उतरलेल्या विद्यार्थ्यांनी मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर उत्कृष्ट गुण मिळवले.
संस्थेतील विद्यार्थीनी तनुजा मोगल हिने ९६.९० टक्के, अनुश्री कुरंगळ ९६.६६ टक्के, कृष्णा बोडखे ९४.७२ टक्के, हर्षदा डोके ९४.६६ टक्के आणि हर्षदा मोगल हिने ९१.९४ टक्के गुण मिळवत यशाचा झेंडा रोवला.
यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. आयसीआय क्लासेसमध्ये नियमित टेस्ट सिरीज, डाऊट सॉल्विंग सेशन्स, वैयक्तिक मार्गदर्शन तसेच पालक संवाद या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढल्याचे यावेळी सांगण्यात आले.
संस्थेचे संचालक विनायक फुके यांनी, “गरीबी ही अडथळा नसते; ती प्रेरणा असते. योग्य दिशा आणि मेहनत असेल तर कोणताही विद्यार्थी यश मिळवू शकतो,” असे प्रतिपादन केले.

0 9 4 6 2 0
Users Today : 34
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *