विदर्भात उभे राहणार ‘वनौषधी हब’; शेतकऱ्यांनी आयुर्वेदिक शेतीकडे वळावे — प्रतापराव जाधव

KHOZ MASTER
1 Min Read

बुलढाणा, दि. २६ (प्रतिनिधी):
विदर्भात वनौषधींची समृद्ध परंपरा असून शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांसोबत औषधी वनस्पतींची लागवड करून उत्पन्नाचे नवे मार्ग खुले करावेत, असे आवाहन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले. शेगाव येथे आयोजित राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026 निमित्त ‘आयुर्वेदिक शेती उत्पादन आणि विक्री मार्गदर्शन’ कार्यक्रमात ते बोलत होते.
आयुष मंत्रालय शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कटिबद्ध असून विदर्भात ‘वनौषधी हब’ विकसित करण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले. उत्पादनाबरोबरच प्रक्रिया उद्योगांवर भर देऊन मालाला मूल्यवर्धन करता येईल. तसेच मंत्रालयामार्फत मार्केटिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याने मध्यस्थांकडील पिळवणूक कमी होऊन शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात National Medicinal Plants Board चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. (डॉ.) महेश कुमार दाधीच तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत नागार्जुन वनऔषधी प्रकल्पाचे प्रभारी डॉ. नितीन पतके यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले. वनौषधींची निवड, लागवड तंत्रज्ञान, काढणीनंतरची प्रक्रिया आणि विपणन यावर त्यांनी सविस्तर माहिती दिली. विशेष म्हणजे, अनेक प्रगतशील शेतकऱ्यांनी कार्यक्रमस्थळीच नामांकित औषधी कंपन्यांशी खरेदी-विक्री करार केले, ज्यामुळे निश्चित बाजारपेठेचा मार्ग खुला झाला.
‘आजीबाईचा बटवा’ सत्रातून घरगुती उपचारांचा मंत्र
चार दिवसीय मेळाव्यात ‘आजीबाईचा बटवा’ या विशेष सत्रालाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. २६ फेब्रुवारी रोजी झालेल्या या सत्रात वैद्य अपश्चिम मालेगावकर यांनी घरगुती आयुर्वेदिक उपचारांची माहिती दिली

0 9 4 6 2 0
Users Today : 34
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *