अंढेरा, दि. २६ (प्रतिनिधी):
गावाची लोकसंख्या १५ हजारांच्या पुढे गेल्याने मेरा बुद्रूक फाटा येथील वाढीव वस्तीवर स्वतंत्र मतदान केंद्र (बुथ) स्थापन करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मेरा बुद्रूक फाटा वस्तीमध्ये गेल्या ३० ते ४० वर्षांपासून सुमारे ७०० ते ८०० नागरिकांचे कायमस्वरूपी वास्तव्य आहे. दर निवडणुकीच्या वेळी येथील महिला व पुरुषांना मतदानासाठी सुमारे एक किलोमीटर अंतर पायी जाऊन गावात मतदानाचा हक्क बजवावा लागतो. विशेषतः वयोवृद्ध नागरिकांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागतो.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, वस्तीवर सुमारे ८०० ते १००० लोकसंख्या असूनही स्वतंत्र बुथची सोय करण्यात आलेली नाही. तसेच या भागातील नागरिकांना PM SVAMITVA Yojana चा लाभ अद्याप मिळालेला नसल्याचीही तक्रार करण्यात आली आहे.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत मतदार यादीमध्ये मेरा बुद्रूक फाटा वाढीव वस्तीवर स्वतंत्र मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी अनिल डोंगरदिवे, आश्रुबा कुमठे, यशोदा कुमठे, रामेश्वर पडघान, ज्योती पडघान, केशव सोळंकी, गोदावरी सोळंकी, रामेश्वर सोळंकी, अंजली सोळंकी, मुरलीधर वायाळ, विमल वायाळ, प्रल्हाद पडघान, प्रवीण पडघान, विठ्ठल इंगळे, प्रदीप पडघान व दीपाली पडघान यांनी केली आहे.
मेरा बुद्रूक फाटा वस्तीवर स्वतंत्र बुथची मागणी
0
9
4
6
2
0
Users Today : 34
Leave a comment