बुलढाणा, दि. २६ (प्रतिनिधी):
उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय मुंबई आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने २४ व २५ फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय ग्रंथोत्सव स्थानिक वाचनालय सभागृहात उत्साहात पार पडला.
२४ फेब्रुवारी रोजी हुतात्मा स्थळापासून ग्रंथ दिंडीला प्रारंभ झाला. दिंडीत भजनी मंडळे तसेच विविध शाळांतील विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता. उद्घाटन सोहळा ज्येष्ठ साहित्यिक प्रतिमा इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी शायर गोपाल मापारी, प्रा. मधुकर वडोदे, कादंबरीकार जगदीशचंद्र पाटील, प्रभाकर घुगे, डॉ. की. वा. वाघ, सुनील वायाळ, विजय पुंडे, मनोज देशमुख, नेमिनाथ सातपुते व जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. अतुल वानखेडे उपस्थित होते. सूत्रसंचालन निशिकांत ढवळे यांनी तर आभार अजय शिरसाठ यांनी मानले.
दुपारच्या सत्रात ‘मराठी भाषे पुढील आव्हाने’ या चर्चासत्राचे अध्यक्ष डॉ. की. वा. वाघ होते. या चर्चेत डॉ. सिद्धेश्वर नवलाखे, डॉ. मनीषा राऊत, प्रा. मोहन शिरसाट व प्रशांत सोनोने यांनी सखोल मंथन केले. सूत्रसंचालन पंजाबराव गायकवाड यांनी केले.
२५ फेब्रुवारी रोजी ‘वाचन संस्कृती : काल, आज आणि उद्या’ या परिसंवादाचे अध्यक्ष प्रा. कमलेश खिल्लारे होते. या सत्रात नेमिनाथ सातपुते, सुनील वायाळ, डॉ. राजेंद्र गंगे, रफिक कुरेशी, देविदास समुद्रवार, अनंत सातव, विष्णू इंगळे, रामभाऊ मुळे, महेंद्र बोर्डे व डॉ. अतुल वानखेडे यांनी सहभाग घेतला.
यावेळी रफिक कुरेशी लिखित नेताजी सुभाष चंद्र बोस आणि सरोजिनी नायडू या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. तसेच शासनाच्या राज्य ग्रंथालय परिषदेवर निवड व ‘ग्रंथमित्र’ पुरस्कार मिळाल्याबद्दल सुनील वायाळ व अनंत सातव यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप चव्हाण यांनी केले.
दुसऱ्या सत्रात सुभाष कीनहोळकर यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन पार पडले. कवी गोविंद गायकी, राजेंद्र काळे, सर्जेराव चव्हाण, रमेश आराख, सुरेश साबळे, संदीप राऊत, अरविंद शिंगाडे व वैशाली तायडे यांनी कविता व गझल सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले
Users Today : 34