खामगाव (प्रतिनिधी):
शिवण क्लासला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडलेली २५ वर्षीय विवाहिता बेपत्ता झाल्याची घटना २४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी खामगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वाडी येथे उघडकीस आली.
खामगाव तालुक्यातील वाडी येथील रहिवासी विनोद महादेव इंगळे (वय ३२) हे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांची पत्नी प्रियंका विनोद इंगळे (वय २५) ही २४ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास शिवण क्लासला जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडली होती. मात्र, क्लासची वेळ संपून बराच वेळ उलटल्यानंतरही ती घरी परतली नाही.
पती विनोद इंगळे यांनी सुरुवातीला प्रियंका मैत्रिणींकडे किंवा नातेवाईकांकडे गेली असावी, या आशेने खामगाव शहरातील विविध ठिकाणी शोध घेतला. बसस्थानक, परिचितांची घरे तसेच नातेवाईकांकडे चौकशी करूनही तिचा कोणताही मागोवा लागला नाही.
याप्रकरणी विनोद इंगळे यांनी २५ फेब्रुवारी रोजी खामगाव शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असून पोलिसांनी बेपत्ता (मिसिंग) नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार संतोष गायकवाड करीत आहेत.
शिवण क्लासला गेलेली विवाहिता बेपत्ता
0
9
4
6
2
0
Users Today : 34
Leave a comment