चिखली, दि. २६ (प्रतिनिधी):
विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतींच्या प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत महायुती सरकारने बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना अंतर्गत १० ग्रामपंचायतींच्या स्वतंत्र कार्यालय बांधकामासाठी निधीस मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे ग्रामीण प्रशासन अधिक सक्षम व लोकाभिमुख होणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
राज्यातील अनेक ग्रामपंचायतींकडे स्वतःची प्रशासकीय इमारत नसल्यामुळे कामकाजात अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन चिखली मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून शासन निर्णयाद्वारे बुलढाणा जिल्ह्यातील संबंधित ग्रामपंचायतींना निधी मंजूर करण्यात आला आहे.
मंजूर निधीचा तपशील:
बुलढाणा तालुका:
सातगाव म्हसला – २५ लाख रुपये
कुलमखेड – २० लाख रुपये
पांगरी – २५ लाख रुपये
केसापूर – २० लाख रुपये
भडगाव – २५ लाख रुपये
डोमरूळ – २५ लाख रुपये
चिखली तालुका:
किन्ही सवडत – २० लाख रुपये
धोत्रा भनगोजी – २५ लाख रुपये
पळसखेड दौलत – २० लाख रुपये
बोरगाव वसू – २० लाख रुपये
या निधीमुळे ग्रामपंचायतींना आधुनिक व स्वतंत्र कार्यालयीन इमारती उभारता येणार असून ग्रामस्थांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.
या मंजुरीबद्दल आमदार श्वेता महाले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांचे आभार मानले.
ग्रामीण विकासाला गती देणे आणि गावपातळीवरील प्रशासन अधिक मजबूत करणे हेच सरकारचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे चिखली विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण विकासाला मोठी चालना मिळणार असून नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे
दहा ग्रामपंचायतींना मिळणार स्वतःचे कार्यालय
0
9
4
6
2
0
Users Today : 34
Leave a comment