चिखली प्रतिनिधी :
विश्रामगृह परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या सराईत चोरट्याला Chikhli पोलिसांनी जालना जिल्ह्यातील Jafrabad तालुक्यातील भारज बुद्रुक येथून अटक केली आहे. गुन्हे शोध पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे ही कारवाई करत चोरीस गेलेली मोटारसायकल जप्त केली.
चोरीची घटना
२० जानेवारी २०२६ रोजी फिर्यादी यांनी आपली हिरो एचएफ डिलक्स (क्र. MH २८ AW २५२१) ही दुचाकी चिखली येथील विश्रामगृहासमोर उभी केली होती. काही वेळाने परतल्यावर दुचाकी चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तांत्रिक तपासातून उलगडा
ठाणेदार भूषण गावंडे यांनी तपास डीबी पथकाकडे सोपविला. तपासादरम्यान पोलीस हवालदार कैलास चतरकर व पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, चोरीची दुचाकी जाफराबाद तालुक्यातील भारज बुद्रुक येथे एका घरासमोर उभी आहे.
माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ धाव घेत संत सावता माळी भवनाजवळ संशयित कृष्णा आत्माराम पवार (वय २४, रा. उमरखेडा, ता. भोकरदन, ह.मु. भारज बु.) याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र इंजिन व चेसिस क्रमांकाची पडताळणी केल्यानंतर ती दुचाकी चोरीची असल्याचे स्पष्ट झाले. विश्वासात घेतल्यानंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पोलीस निरीक्षक भूषण गावंडे, पोलीस उपनिरीक्षक शरद भागवतकर, सहाय्यक फौजदार राजेंद्र काळे यांच्यासह अमोल गवई, प्रशांत धंदर, अजय इटावा, पंढरीनाथ मिसाळ, राहुल पायधन, निलेश सावळे, विशाल वायाळ, रुपाली उगले, कैलास चतरकर आणि ज्ञानेश्वर शिंदे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
Users Today : 34