शेगाव प्रतिनिधी :
येथे आयोजित ‘आयुष आरोग्य मेळावा’च्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला उत्तम आरोग्य तपासणी व तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देणे, हाच आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना एकाच ठिकाणी सुलभ, परवडणारी आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा मिळावी, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
विशेषतः नेत्रविकारांवर पारंपरिक आयुष पद्धतींच्या माध्यमातून उपचार व दृष्टी सुरक्षिततेवर अधिक भर दिला जात आहे. आयुर्वेदिक औषधोपचार, योगाभ्यास व जीवनशैलीतील सकारात्मक बदल यांच्या साहाय्याने डोळ्यांचे आरोग्य जपण्याबाबत मार्गदर्शन केले जात आहे.
आयुष पद्धतींचा अंगीकार करून आपण केवळ रोगांवर उपचार करत नाही, तर ‘वेलनेस’ आधारित निरोगी जीवनशैलीची जनजागृतीही करत आहोत. प्रतिबंधात्मक आरोग्य, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि योगसाधना यांचा संदेश या मेळाव्यातून दिला जात आहे.
चला, आपण सर्वजण मिळून ‘रोगमुक्त आणि निरोगी जीवन’ हा संकल्प प्रत्यक्षात उतरवूया.
Users Today : 34