जात-धर्मापेक्षा महाराष्ट्रप्रेम महत्त्वाचे” — राज ठाकरे यांची खास पोस्ट चर्चेत मनसेच्या 20 व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यकर्त्यांना भावनिक संदेश

KHOZ MASTER
2 Min Read


Maharashtra Navnirman Sena (मनसे)

या पक्षाचा आज २० वा वर्धापनदिन साजरा होत आहे. पक्षप्रमुख Raj Thackeray यांनी २००६ मध्ये Shiv Sena मधून बाहेर पडल्यानंतर या पक्षाची स्थापना केली होती. दोन दशकांचा टप्पा पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रायगड येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी राज ठाकरे आणि मनसेचे अनेक नेते-पदाधिकारी रायगडाच्या पायथ्याशी जमले असून ते प्रथम Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.

दरम्यान, वर्धापनदिनानिमित्त राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली असून ती सध्या मोठ्या चर्चेत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मराठी भाषा, मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मनसेने गेल्या २० वर्षांत केलेल्या कामांचा उल्लेख केला आहे.

राज ठाकरे यांनी लिहिले की, “२० वर्षांपूर्वी मराठी माणूस, भाषा आणि अस्मिता या गोष्टींचा सर्वांना विसर पडला होता. तो जागृत करण्याचे काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केले. आज कुठेही मराठी माणसावर अन्याय झाला तर ‘कुठे आहे मनसे?’ असा प्रश्न लोक विचारतात, यातच आपण काय कमावलं आहे याचा अंदाज येतो.”

युवकांना पक्षात सहभागी होण्याचे आवाहन

राज ठाकरे यांनी पोस्टमधून महाराष्ट्रातील तरुणांना पक्षात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. १० मार्च २०२६ पासून मनसेची सदस्य नोंदणी सुरू होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

यावेळी त्यांनी एक महत्त्वाचा संदेश देत म्हटले की,
“तुमची राजकीय विचारधारा, तुमची जात, तुमचा धर्म यापेक्षा तुम्ही महाराष्ट्रप्रेमाने झपाटलेले आहात हेच महत्त्वाचे आहे.”

पुढे त्यांनी सांगितले की, सदस्य झाल्यावर कार्यकर्ते केवळ “महाराष्ट्र सैनिक” राहणार नाहीत तर “महाराष्ट्राचे पाईक” म्हणून काम करतील आणि एक नवा महाराष्ट्र घडविण्याच्या कामात सहभागी होतील.

मनसेच्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त राज ठाकरे यांची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत असून कार्यकर्त्यांमध्ये नव्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे

0 9 3 9 0 9
Users Today : 45
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *