शासनाच्या योजना शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी कटीबद्ध – आमदार सिद्धार्थ खरात

KHOZ MASTER
1 Min Read

मेहकर :

तालुक्यातील शेंदला येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातून महसूल विभागाच्या विविध सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आल्या.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सिद्धार्थ खरात होते. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, शासनाच्या विविध योजना आणि सुविधा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत.

या शिबिरामध्ये महसूल विभाग आणि तहसील कार्यालय मेहकर यांच्या वतीने अनेक नागरिकांना विविध शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. तसेच अनेक प्रलंबित प्रकरणांचा जागेवरच निपटारा करण्यात आला.

या कार्यक्रमाला श्याम पाटील निकम, नायब तहसीलदार विवेक नालट, निवासी नायब तहसीलदार नितीन बोरकर, गटविकास अधिकारी दिनकरराव खरात तसेच ग्राम महसूल अधिकारी, ग्राम विकास अधिकारी आणि विविध गावांचे सरपंच उपस्थित होते.

या शिबिराचा लाभ सावत्रा, सोनार गव्हाण, नायगाव, दत्तापूर, मोहना खुर्द, शेंदला, मारोतीपेठ, माळेगाव, पिंप्रीमाळी, साब्रा, गोंढाळा आणि काबरा घोणसर

या गावांतील नागरिकांनी घेतला.नागरिकांच्या समस्या त्वरित सोडवण्यासाठी आणि प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवण्यासाठी अशा प्रकारची शिबिरे अत्यंत महत्त्वाची असल्याचेही आमदार खरात यांनी यावेळी सांगितले.

0 9 3 8 7 2
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *