मेहकर प्रतिनिधी –
बायपास रोडवरील एका एकांत हॉटेल आणि लॉजिंगमध्ये चालत असलेला कुंटणखाना मेहकर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. महिलांकडून देहव्यापार करवणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली असून, लॉज मालकाविरुद्धही गुन्हा दाखल केला गेला आहे. ही कारवाई १५ मार्च रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास करण्यात आली.
पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर एस आलेवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार केले. पोलिसांनी रात्री साडेअकराच्या सुमारास छापा टाकला असता, महिलांकडून कुंटणखाना चालवणारा प्रमोद धनसिंग पवार (रा. बीबी, ता. लोणार) ताब्यात घेतला. यावेळी दोन महिला आढळल्या.
आरोपी प्रमोद पवार तसेच लॉज मालकाविरुद्ध अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक अधिनियम (कलम ३, ४, ५, ६, ७) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात आणखी आरोपींचा समावेश होण्याची शक्यता आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पथकात पोलीस निरीक्षक आलेवार, पीएसआय कांचन जारवाल, पो-हेका लक्ष्मण कटक, प्रभाकर शिवणकर, शिवानंद केदार, शिपाई मोहंमद परसुवाले, करीम शहा, शिवाजी चिम, विनोद फुफाटे, आम्रपाली सरकटे आणि होमगार्ड सदस्य सचिन इंगळे, सुनील काटकर, उमेश देबाजे यांचा समावेश होता.
पोलिसांनी ही कारवाई डमी ग्राहक पाठवून खात्री केल्यानंतर केली, ज्याद्वारे महिलांकडून देहव्यापार सुरु असल्याची पुष्टी झाली.
Users Today : 14