संग्रामपूर –
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना अंतर्गत पळशी झाशी शंकरगिरी महाराज तीर्थस्थळाला दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
संग्रामपूर तालुक्यातील हे तीर्थस्थळ लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून, शासनाने त्यास ब दर्जा तीर्थस्थळाचा दर्जा देखील प्रदान केला आहे. निधीच्या माध्यमातून भव्य सभागृह, प्रसादालय व इतर विकासकामे राबविली जाणार आहेत.
या यशासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांनी पाठपुरावा केला होता. निधी मंजूर झाल्याबद्दल संस्थेचे विश्वस्त अरुण पाटील मारोड यांनी केंद्रीयमंत्र्यांचा सत्कार करून धन्यवाद व्यक्त केला.
Users Today : 16