पाडळी शिंदे :
थकीत वीज बिल वसुलीसाठी Maharashtra State Electricity Distribution Company Limited अर्थात महावितरणकडून ‘मिशन ९० दिवस’ अंतर्गत धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेला वेग आला असून वीज चोरी करणाऱ्या आकडेधारकांवरही कठोर कारवाई करण्यात येत असल्याने वीज चोरट्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Padli Shinde तसेच परिसरातील गावांमध्ये महावितरणचे अधिकारी व कर्मचारी घराघरात जाऊन थकीत वीज बिल वसुली करत आहेत. थकीत बिल तात्काळ न भरल्यास संबंधित ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.
यापूर्वी थकीत बिलधारकांवर कारवाई होत असताना वीज चोरी करणारे आकडेधारक मोकाट राहत असल्याची नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत होती. ही बाब लक्षात घेऊन आता वसुलीसोबतच वीज चोरी करणाऱ्यांवरही तातडीने कारवाई करण्यात येत आहे.
या मोहिमेत कनिष्ठ अभियंता खरात, अभियंता तायडे, लाईनमन जायभाये तसेच मदतनीस भुतेकर आणि सुरडकर आदींचा पथकात समावेश आहे. अधिकारी व कर्मचारी रखरखत्या उन्हातही गावागावांत फिरून थकीत वीज बिल वसुली करत आहेत.
दरम्यान, वीज चोरीसाठी हुक टाकणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात येत असल्यामुळे वीज चोरट्यांचे धाबे दणाणले आहेत. थकीत वीज बिल वेळेत भरून महावितरणला सहकार्य करावे तसेच वीज चोरी टाळून अधिकृत वीज जोडणी घ्यावी, असे आवाहन कनिष्ठ अभियंता खरात यांनी केले आहे.
Users Today : 6