डाभा येथे लम्पी स्क्रीनचा पहिला बळी लसीकरण सुरू, मात्र शेतकरी चिंतित

Khozmaster
2 Min Read

सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत  शेतकरी संतोष दांडगे यानां तात्काळ नुकसान भरपाई देण्याची;विठ्ठल दांडगे(सहसचिव) यांची मागणी तालुक्यातील फर्दापूर जिल्हा परिषद सर्कलमध्ये सावळदबारा परिसरात पशुसंवर्धन विभागाच्या वतीने लसीकरण मोहीम राबविली जात असली तरी लम्पी स्किन आजाराचा धोका अजूनही टळला नसल्याचे दिसत आहे.शेतकरी व पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे.फर्दापूर सर्कलमधील सावळदबारा पशुवैद्यकीय केंद्रा अंतर्गत येणाऱ्या परिसरात आतापर्यंत नेमक्या किती गुरांना लम्पी स्किन आजाराची लागण झाली आहे.सर्कलमधील सावळदबारा पशुवैद्यकीय केंद्रा अंतर्गत येणाऱ्या डाभा गावात लम्पी स्किन आजाराने पहिला बळी घेतला आहे. शेतकरी बाळू संतोष दांडगे डाभा ता सोयगाव यांचा बैल लम्पी स्किन आजारामुळे दगावला यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या हस्ते पंचनामा करण्यात आला.यावेळी सरपंच राहूल हेलोडे, उपसरपंच सुनील दांडगे, रामेश्वर दांडगे, गोपाळ दांडगे, रविंद्र दांडगे, राहूल दांडगे, आकाश दांडगे, धोंडू गरुड, किसन जाधव, गणेश ठोके,ईश्वर शेळके(शाखा अध्यक्ष),व ग्रामस्थ उपस्थित होते.बाळू दांडगे याचां बैल दगावल्याने शेतकरी व पशुपालक यांच्या मधे चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.याबाबत अधिकृत आकडेवारी उपलब्ध झाली नसली तरी रविवारी रात्री बाळू दांडगे यांच्या बैलाचा लम्पी स्किन आजाराने मृत्यू झाल्याची घटना सकाळी दि.३/१०/२२ सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे.पशुसंवर्धनवि भागाच्या वेगाने लसीकरण मोहीम परिसरात चालू आहे. पशुपालक यांनी घाबरून जाऊ नये असे सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ. जी.एस.लांडगे यांनी सांगितले. गुरांना लम्पी स्क्रीन आजाराची लागण झाली असून बाधित गुरांवर तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ विनोदकुमार चव्हाण वैद्यकीय उपचार करत आहे.तरी शेतकरी बाळू संतोष दांडगे याचां एक बैल गेल्याने ते हतबल झाले त्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे सहसचिव विठ्ठल दांडगे यांनी केली आहे.

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *