• डॉ.व्ही.पी.राजपूत वैद्यकीय अधिकारी यांची माहिती
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील जयकालिंका देवी शिक्षण संस्था सावळदबारा संचलित छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्दालय सावळदबारा प्राचार्य नारायण कोलते(पाटील) व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ व्ही.पी.राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी विद्दालयात “माता सुरक्षित तर घर सुरक्षित”अभियान दि.३/१०/२२ सोमवार रोजी राबविण्यात आले. नवरात्रोत्सवानिमित्त आरोग्य विभागामार्फत ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित हे अभियान राबविले जात असून, प्राथमिक रुग्णालय सावळदबारा यांच्या वतीने अभियान सुरु करण्यात आले असून या अंतर्गत गरोदर माता व १८ वर्षावरील महिलांची मोफत तपासणी व उपचार करण्यात येणार असून, जास्ती जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ व्ही.पी.राजपूत यांनी शिवाजी विद्दालयात अभियानात सांगितले.वैद्यकीय अधिकारी डॉ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. हे अभियान ५ ऑक्टोबर २०२२ या नवरात्रोत्सव कालावधीत विविध उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.अशी माहिती प्रा.जीवन कोलते(सामाजिक कार्यकर्ते)यांनी उपसंपादक गोकुळसिंग राजपूत याच्याशी बोलताना सांगितले.याप्रसंगी सौ.रत्नाताई पंजाबराव कोलते सचिव,प्रा.मदनभाऊ डोखळे(सामाजिक कार्यकर्ते)प्रा.गजानन चव्हाण, निता हिरास मँडम,सरपंच स्वातीताई कोलते,उपसरपंच मो.आरिफ मो.लुखमान, रामचंद्र चिमणकर,दिपक मानकर, राजू तडवी, ईसा तडवी, मयूर महाजन, योगेश टिकारे, संजय राजपूत, संदीप सुर्यवंशी,भास्कर खंबाट,अमोल गवई,अजाबराव राजपूत,शाम जाधव,शिक्षकवृंद, विद्यार्थी,महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरोग्य सुविधा उपलब्ध
अभियानांतर्गत ज्ञामार्फत तपासगी समुपदेशन व औषधोपचार मोफत करण्यात येणार असून डॉ.व्ही.पी.राजपूत यांनी केले आहे. यातील तसेच सावळदबारा परिसरातील १८ वर्षावरील सर्व महिला माता गरोदरच आरोग्य तपासणी प्रति आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध असून विविध उपक्रमांतून हे अभियान राबविण्यात येत असल्याचे डॉ. विलास राजपूत यानी सांगितले, “माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानाचे कार्यक्रमाचे उद्घाटन आजच्या दिवसाचे शाळेचे अध्यक्ष भाऊराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. अधिकारी,कर्मचारी, परिचारिका उपस्थित होते.