सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत हरेश्वर पिंपळगाव पोलीसात तक्रार दाखलता लुक्यातील मौजे कोल्हे येथील एक मोल मजुरी करून उदर निर्वाह करणारे पती पत्नी बेबीबाई रमजान तडवी व रमजान बबन तडवी हे त्यांच्या मुलगा सोहिल वय १७ वर्ष मुलगी सोनम वय १५ असा त्यांचा परिवार असून दि.२८.०९.२०२२.रोजी ठीक ०८:०० वाजता रात्रीचे जेवण करण्यासाठी घरात दरवाजा बंद करून बसले असता तेथील गाव गुंड नामे सागर रशिद तडवी हा त्यांचा दरवाजा जोर जोरात वाजवू लागला मात्र या परिवाराला दरवाजा वाजवायचे कारण समजले नाही कारण ते कुणाच्या घेण्या देण्यात नसतात म्हणून त्यांनी पटकन दरवाजा उघडला तितक्यात सागर हा आत शिरला व बेबीबाई तडवी यांच्या अंगावर जाऊन त्यांना मारायला लागला बेबीबाई यांचे पती मद्यस्ती करायला आले असता त्यांना हि संबंधित गावगुंडानी बेदम मारहाण केली हा प्रकार घडत असताना मुलांना आपल्या आई वडिलांना हा गाव गुंड का मारत आहे हे कळण्या अगोदरच गाव गुंड सागर तडवी याने घराच्या बाहेर पळ काढला व गल्लीमध्ये उभा राहून बेबीबाई रमजान तडवी यांना गलिच्छ भाषेत शिवीगाळ करू लागला त्याला घरात येऊन मारण्याचे कारण विचारले त्यावर माझ्या बापाला तुम्ही शिवगाळ केली या स्वरुपाची वक़्तव्य हा गाव गुंड सागर रशिद तडवी याने केले त्यानुसार पीडित महिलेची सासू कमराबाई बबन तडवी यांनी रशीद तडवी यांना घरी जाऊन विचारले कि तुम्हाला शिवीगाळ कोणी केले त्यावर रशीद तडवी यांनी सांगितले कि मला काहीही माहित नाही व मला कोणीही शिवगाळ केली नाही यावरून हे निष्पन्न होते कि सागर हा कुणाच्या सांगण्यावरून (सुपारी घेऊन) पीडित कुटुंबाच्या घरात घुसून त्यांना मारहाण करत होता, सदरील घडलेल्या प्रकाराची पोलीस स्टेशन हरेश्वर पिंपळगाव येथे दि.२९.०९.२२.रोजी तक्रार दिलेली असून पीडित पती पत्नीला झालेल्या मारहाणीचा अधिक त्रास जाणवल्याने त्यांनी दि.३०.०९.२०२२ रोजी मेडिकल करण्यास स्थानिक पोलीस विभागाकडे मागणी केली त्यावर पोलीस विभागाने त्यांना पिंपळगाव हरेश्वर येथील सरकारी रुग्णालयात मेडिकल करून घेण्यात सांगितले व मेडिकल करून घेण्यात आले तरी संबंधित गाव गुंड सागर रशीद तडवी याने या अगोदर हि गावात किती तरी नागरिकांना त्रास देऊन मारहान केलेली आहे गावातील महिलांना तो हानामारी करताना ती महिला आहे या गोष्टीची जराही परवा करत नाही, कि या अगोदर देखील त्याने महिलेला सार्वजनिक गल्लीमध्ये आणून बेदम मारहान केलेली आहे या गाव गुंडाला “अभय” आहे तरी कुणाचे? कि तो स्थानिक पोलीस प्रशासनाला हि घाबरत नाही. या गाव गुंडावर असलेले एकून गुन्हे उघड करण्याची मागणी नागरीकांकडून होत असून हा कुणालाही मारताना विचार करत नाही याला कायद्याने कठोरात कठोर शिक्षा व्हावी म्हणजे कोल्हे या गावात कुणी नवीन सागर दादा बनणार नाही ही मागणी नागरीकांकडून होत आहे.