सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत अजिंठा वनपरिक्षेत्राचे अधिकारी निलेश सोनवणे यांनी केली जनजागृती सोयगाव तालुक्यातील घाणेगांव तांडा येथे दि.३/१०/२२ सोमवार रोजी अजिंठा येथील वनपरिक्षेत्राचे अधिकारी निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव सप्ताह निमित्ताने जनजागृती कार्यक्रम संपन्न वनपरिमंडळ अंतर्गत सावळदबारा वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे घाणेगाव येथे प्राथमिक व उच्च प्राथमिक आश्रम शाळा येथे वन्यजीव सप्ताह 2022 निमित्ताने जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सरपंच सौ.रत्नाताई सुरेश चव्हाण, उपसरपंच हिरा जाधव, गोविंद महाराज, सुरेश चव्हाण(सामाजिक कार्यकर्ते),लक्ष्मण पवार, ग्रामसेवक एस.ए.रणजिते,वन परिमंडळ अधिकारी अविनाश राठोड,वनरक्षक एस बी खर्डे, वनरक्षक एस डी चाथे, वनरक्षक जि पी नन्नावरे, वनरक्षक बी आर राठोड, वनरक्षक डी ए वाघ वनमजूर के डी महाकाळ गावातील प्रतिष्ठित नागरिक,शेतकरी, मुख्याध्यापक, तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते. यावेळी मानव वन्यजीव संघर्ष , चित्ता re-introduction, आझादी का अमृत महोत्सव , झाडे लावा झाडे जगवा, वन्यप्राणी संरक्षण व संवर्धन, जंगल संरक्षण व संवर्धन याबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले.