सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव,फर्दापूर-सावळदबारा मतदारसंघातून जवळपास 500 बसेस व इतर लहान मोठी वाहने मुंबई येथील बिकेसी मैदानावर होणाऱ्या दसरा मेळावा साठी रवाना झाल्या आहेत. कृषीमंत्री अब्दुल सत्तार सोयगाव मित्र मंडळाचे अतिशय सुरेख पद्धतीने नियोजन यावेळी दिसून आले. आज सकाळ पासूनच शिवसैनिकांनी सोयगाव येथील मंत्री अब्दुल सत्तार यांच्या कार्यालय येथे गर्दी केली होती. मुंबई ला जाणाऱ्यासाठी या ठिकाणी भोजन व्यवस्था करण्यात आली होती.सोयगाव हुन मुंबई येथील मेळाव्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने जाण्याचा हा पाहिलाच प्रसंग आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी व त्यांना समर्थन देण्यासाठी प्रचंड संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जि.प.सदस्य गोपीचंद जाधव यांनी मतदारसंघात बैठका घेवून शिवसैनिकांना अवाहन केले होते. या आवाहनाला साद देत ग्रामीण भागातील सावळदबारा, देव्हारी, टिटवी, पिंपळवाडी, महाल्बदा, चारुतांडा, नादातांडा नादागांव,मोलखेडा, हिवरी, चारुतांडा,घाणेगांव तांडासह प्रचंड संख्येने शिवसैनिक मुंबई कडे रवाना झाले आहेत.यावेळी नादातांडा येथे शुद्धा सोयगाव पंचायत समितीचे मा.सभापती धरमसिंग चव्हाण यांच्या कार्यालयावर शिवसैनिकांनी मुंबईला जाण्यासाठी मोठी गर्दी केली होती.मा.दारासिंग चव्हाण,मा.शिवाआप्पा चोपडे, मा.सभापती धरमसिंग चव्हाण, देवीदास चव्हाण,सरपंचपती सुरेश चव्हाण,पत्रकार गणेश खैरे,सरपंच ज्ञानेश्वर वारांगणे, अमोल शेळके, आतुल इंगळे,ग्रा.सदस्य मोहन सुरडकर, दिपक गावडे, अरुण नप्ते, लखन चव्हाण, सरपंच भागवत जाधव,संदीप जाधव,सरपंच राहुल हेलोडे, मा.सरपंच किसन सुर्यवंशी अशे मोठ्या संख्येने शिवसैनिक दसरा मेळावासाठी मुंबई कडे रवाना झाले आहेत अशी माहिती जि.प.सदस्य गोपीचंद जाधव यांनी बोलताना सांगितले.