लोणार–हिरडव मुख्य मार्गाची दुरवस्था; खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला 🚧

KHOZ MASTER
2 Min Read

Dabha

Lonar ते Hirdav हा दाभा, पहूर, आरडाव, वढव तसेच Risod या भागांना जोडणारा महत्त्वाचा मुख्य मार्ग सध्या अत्यंत खराब अवस्थेत आहे. रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून अपघातांचा धोका वाढला आहे.

शेकडो वाहनांची रोजची वर्दळ 🚗

या मार्गावरून दररोज शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी तसेच रुग्णांची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू असते. विशेष म्हणजे हिरडव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असल्यामुळे परिसरातील अनेक गावांतील रुग्णांना उपचारासाठी याच मार्गाचा वापर करावा लागतो.

मात्र रस्त्यावरील भीषण खड्ड्यांमुळे रुग्णवाहिका आणि दुचाकीस्वारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक वेळा रुग्णांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

पळसखेड परिसरात रस्ता पूर्ण उखडला

Palaskhed परिसरात रस्ता पूर्णपणे उखडून गेला असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे खड्ड्यांची खोली ओळखणे कठीण होते, त्यामुळे वाहन घसरून अपघात होण्याचा धोका अधिक वाढतो.

तक्रारी करूनही कारवाई नाही

स्थानिक नागरिकांच्या मते, रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेक वेळा तक्रारी देण्यात आल्या, मात्र प्रशासनाकडून केवळ आश्वासनेच मिळत आहेत. काही ठिकाणी तात्पुरत्या उपाययोजना केल्या जातात, पण काही दिवसांतच रस्ता पुन्हा खड्ड्यांनी भरून जातो.

तातडीने दुरुस्तीची मागणी

लोणार–हिरडव हा मार्ग दाभा, पहूर, आरडाव, वढव, गुंजखेड, बागूलखेड, गुंधा, अत्री मार्गे मेहकर आणि रिसोड या भागांना जोडणारा जीवनदायी मार्ग मानला जातो. तसेच हिरडव येथे शाळा, महाविद्यालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र असल्यामुळे या रस्त्याचे महत्त्व अधिक वाढले आहे.

म्हणूनच पळसखेड परिसरातील सर्व खड्डे त्वरित बुजवून रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

0 9 7 1 5 7
Users Today : 10
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *