बोंदु बाबा खरात प्रकरणामुळे मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे.
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.
आज मुंबईत झालेल्या बैठकीत त्यांनी पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला.
याआधीच महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर, आता पक्षातील महत्त्वाचं पदही त्यांनी गमावलं आहे.
या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून, पुढे काय घडामोडी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
भोंदूगिरीच्या आडून महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे
अत्यंत गंभीर आरोप अशोक खरात याच्यावर आहेत.
या प्रकरणाशी संबंधित अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
याच पार्श्वभूमीवर
खरातला पाठीशी घातल्याचा आरोप रुपाली चाकणकर यांच्यावर करण्यात येत आहे.
तसेच त्यांच्या आणि खरात यांच्यात आर्थिक व्यवहार असल्याचाही दावा केला जात आहे. मात्र या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात
मोठी खळबळ उडाली असून
आगामी काळात या प्रकरणात आणखी कोणते खुलासे होतात
हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Users Today : 10