वर्दडी बुद्रूक :
अखिल भारतीय अखिल भारतीय छावा संघटना चे जिल्हाध्यक्ष अशोकराजे जाधव हे भीषण अपघातातून सुखरूप बचावले असून डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे ते मृत्यूच्या दाढेतून परतल्याची घटना घडली आहे. दीड महिन्यांच्या उपचारानंतर ते आता घरी परतले असून अनेक मान्यवर त्यांची भेट घेऊन धीर देत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंदखेडराजा येथे छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंती उत्सवानिमित्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी जात असताना अज्ञात वाहनाने अशोकराजे जाधव यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली आणि वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला. या अपघातात जाधव गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच मित्रपरिवार आणि नातेवाईकांनी त्यांना तात्काळ कलावती रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. येथे डॉ. कृष्णा कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अनिरुद्ध पाटील व इतर डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून त्यांच्यावर यशस्वी उपचार केले.
सुमारे दीड महिन्यांच्या उपचारानंतर त्यांची प्रकृती सुधारली असून ते घरी परतले आहेत. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी बुलढाणा व जालना जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते भेट देत आहेत.
यावेळी जालना येथील काकडे उद्योग समूहाचे प्रमुख दत्तात्रय काकडे, उद्योजक विलास सावंत आणि गजानन काकडे यांनीही भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत त्यांना धीर दिला.
Users Today : 9