७२ वर्षीय माजी सैनिकाचा आकस्मिक मृत्यू

KHOZ MASTER
1 Min Read

मोताळा :
मोताळा शहरातील ७२ वर्षीय माजी सैनिक वसंता जगन्नाथ घडेकर यांचा अचानक मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. त्यांच्या निधनाने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वसंता घडेकर यांची गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अचानक प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय, मोताळा येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी ग्रामीण रुग्णालयातील कक्षसेवक अमरदीप मिसाळ यांच्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून पुढील तपास सुरू आहे.

माजी सैनिक वसंता घडेकर यांच्या निधनामुळे मोताळा शहरात शोककळा पसरली असून अनेकांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे

0 9 7 1 5 6
Users Today : 9
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *