नांदुरा –
इराण-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर इंधन व नैसर्गिक वायूबाबत अफवा पसरत असल्याने नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन तहसीलदार अजितराव जंगम यांनी केले आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, आवश्यकतेनुसारच इंधन व गॅसची खरेदी करावी. भीतीपोटी अनावश्यक खरेदी किंवा साठेबाजी करू नये. नागरिकांनी संयम राखून प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.
तसेच इंधन किंवा गॅसचा अनावश्यक साठा करणाऱ्यांवर तसेच अफवा पसरविणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. नागरिकांनी कोणत्याही अप्रामाणिक किंवा दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अनावश्यक साठेबाजी टाळल्यास इंधन व गॅसचा पुरवठा सर्व नागरिकांना सुरळीतपणे उपलब्ध राहू शकतो, असेही तहसीलदार जंगम यांनी नमूद केले.
Users Today : 10