मुख्यमंत्र्यांना माजी राज्यमंत्री Subodh Sawaji यांचे पत्र; दोन रुपये दरकपातीत जनतेला काय दिलासा?
डोणगाव –
राज्यात पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करत माजी राज्यमंत्री Subodh Sawaji यांनी मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांना पत्र पाठविले आहे. राज्यात प्रत्यक्षात इंधन तुटवडा आहे का, याची खात्री करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांसह हेलिकॉप्टरमधून हवाई पाहणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सावजी यांनी पत्रात म्हटले आहे की, सध्या पेट्रोल पंपांवर तसेच गॅस एजन्सीजसमोर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. वाहनधारकांना अनेक तास प्रतीक्षा करूनही पेट्रोल व डिझेल मिळत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी सरकारने पेट्रोल व डिझेलच्या दरात केवळ दोन रुपयांची कपात केल्याचे सांगितले, मात्र वाढलेल्या दरांच्या तुलनेत ही कपात अपुरी असल्याचा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सावजी यांनी पुढे नमूद केले की, मुख्यमंत्री मुंबईतून राज्यातील जनतेला इंधन दरकपातीची घोषणा करतात; परंतु प्रत्यक्ष परिस्थिती पाहण्यासाठी हवाई पाहणी केल्यास पेट्रोल पंपांवरील रांगा, समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या वाहनांच्या रांगा तसेच अनेक गावांमध्ये घरगुती गॅसची कमतरता याचे वास्तव चित्र दिसून येईल.
दरम्यान, पंतप्रधान Narendra Modi तसेच राज्य सरकारने इंधनाचा तुटवडा भासू देणार नसल्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी असल्याचा दावा सावजी यांनी केला आहे. वाहनधारक वाहनात मावेल तेवढेच इंधन घेत असल्याने साठेबाजी होत असल्याचा आरोप चुकीचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात आर्थिक परिस्थिती कठीण असताना पेट्रोल, डिझेल किंवा गॅस साठवून ठेवणे सामान्य नागरिकांना शक्य नाही, असे सांगत सरकारने तातडीने उपाययोजना करून महाराष्ट्रातील जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा राज्यात जनतेचा आक्रोश वाढण्याची शक्यता असल्याचा इशाराही सावजी यांनी दिला आहे. ⛽
Users Today : 127