संग्रामपूर : पीएमश्री जि.प. हायस्कूलचे १४ विद्यार्थी एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी 🎓📚

KHOZ MASTER
1 Min Read

संग्रामपूर –

पीएमश्री जिल्हा परिषद हायस्कूल, संग्रामपूर येथील १४ विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक (NMMS) शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

या परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना पुढील पाच वर्षांसाठी दरवर्षी १२ हजार रुपये, अशा एकूण ६० हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत शाळेची मागील १५ वर्षांची यशस्वी परंपरा कायम ठेवली आहे.

या परीक्षेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कोमल गोमासे, साक्षी भोपळे, अंकित गोतमारे, सुपेश सरदार, रोशनी वानखडे, पायल मोरखडे, पूर्वी हागे, ज्ञानेश्वरी पोफळणारे, गौरी वेरूळकर, विराज बारब्दे, शिवम उमाळे, श्रेया पुंडे, आचल डामरे आणि सोहम उमाळे यांचा समावेश आहे. 🌟

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे, असे मत मुख्याध्यापक योगेश विश्वास कुकडे यांनी व्यक्त केले.

या यशासाठी शिक्षणाधिकारी विकास पाटील, गटशिक्षणाधिकारी टाले, मुख्याध्यापक योगेश विश्वास कुकडे तसेच सर्व शिक्षकवृंद आणि शाळा व्यवस्थापन समिती यांचे मार्गदर्शन लाभले. 👏

0 9 7 1 5 5
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *