सुटाळा येथे शिव-पार्वती विवाह सोहळा उत्साहात संपन्न 🔱🌸

KHOZ MASTER
1 Min Read

खामगाव –

शहरापासून जवळ असलेल्या सुटाळा बु. येथे महादेव संस्थानच्या प्राचीन शिव मंदिरात चैत्र महिन्यातील अष्टमीच्या दिवशी २५ मार्च २०२६ रोजी शिव-पार्वती विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

या पवित्र सोहळ्यानिमित्त महादेव संस्थानतर्फे मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मानाच्या कावड यात्रेद्वारे पूर्णा नदीच्या पात्रातून पाणी आणून महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करण्यात आला. तसेच गावातून काठी फिरवत मंदिराला प्रदक्षिणा घालून विवाह सोहळ्याला सुरुवात करण्यात आली.

मंदिर परिसरात हजारो भाविक भक्तांची उपस्थिती होती. सर्व भाविकांना अक्षदा वाटून गुलाबी रंगाची उधळण करण्यात आली. त्यानंतर संजय महाराज बावस्कर यांच्या हस्ते विधीवत पूजा-अर्चा, मंत्रोच्चार आणि मंगलाष्टकांच्या गजरात शिव-पार्वती विवाह सोहळा संपन्न झाला. 🔔🙏

या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, शहराध्यक्षा सरस्वतीताई खासने, तालुकाध्यक्ष मनोज वानखडे, केशव कापले, सरपंच दिनेश इंगळे, उपसरपंच नारायण पाटील, ग्रामपंचायत सदस्य रवि भोपळे तसेच महादेव संस्थानचे अध्यक्ष श्रीकृष्ण इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.

0 9 7 1 5 5
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *