धाडनगरीत ‘रामराज्याचा’ अनुभव; भगव्या वादळाने मोडले गर्दीचे सर्व रेकॉर्ड 🚩🙏

KHOZ MASTER
3 Min Read

धाड – ‘

जय श्रीराम’च्या गगनभेदी घोषात, बॅन्जोच्या दणदणाटात आणि हातात फडकणाऱ्या भगव्या ध्वजांच्या साक्षीने धाडनगरीत प्रभू श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. २६ मार्च रोजी साजऱ्या झालेल्या या उत्सवाने भक्तीचा महासागर उसळला आणि आजवरच्या गर्दीचे सर्व विक्रम मोडत ऐतिहासिक शोभायात्रेची नोंद झाली.

स्थानिक वॉर्ड क्रमांक ६ मधील श्रीराम मंदिर संस्थानात सकाळी उत्सवाची सुरुवात झाली. मंदिर समितीतर्फे मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली होती. फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाईमुळे मंदिर परिसर एखाद्या वैकुंठासारखा भासत होता. दुपारी ठीक १२ वाजता रामलल्लाचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला.

या वेळी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा छत्रपती शिवशंभू स्मारक समितीचे अध्यक्ष वैभवराजे मोहिते, मंदिर समितीचे अध्यक्ष सुभाष जाधव, नाना माळोदे, बाळू माळोदे, ठाणेदार प्रताप भोसले, महिला व बालकल्याण अधिकारी प्रमोद वेंडोले, विनोद खडके यांच्या हस्ते प्रभू रामचंद्रांची महाआरती करण्यात आली. ‘भये प्रगट कृपाला’च्या सुरांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला. आरतीनंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

सायंकाळी ६ वाजता भव्य शोभायात्रेला प्रारंभ झाला. उत्सव समितीचे अध्यक्ष गणेश जाधव, अजय शिंदे आणि वैभव माळोदे यांच्या नेतृत्वात फुलांनी सजवलेल्या भव्य ट्रॅक्टरमध्ये प्रभू श्रीरामाची मूर्ती विराजमान करण्यात आली. ‘राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की’च्या जयघोषात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत शोभायात्रा मार्गक्रमण करत होती. 🚩

शोभायात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचल्यावर रामभक्तांनी लाठी, काठी आणि तलवारबाजीची थरारक प्रात्यक्षिके सादर केली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक विद्याधर महाले आणि वैभवराजे मोहिते यांच्या हस्ते श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली.

यानंतर मिरवणूक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात पोहोचल्यावर वैभवराजे मोहिते आणि अभिनय बोडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि सामाजिक सलोख्याचा संदेश दिला.

जुना आठवडा बाजार, सरोदे गल्ली, कुंभार गल्ली, हनुमान मंदिर, धर्मजागृती चौक, सराफा गल्ली मार्गे मार्गक्रमण करत शोभायात्रा छत्रपती संभाजी महाराज चौकात समारोप करण्यात आली.

या वर्षीच्या शोभायात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे महिलांची लक्षणीय उपस्थिती होय. तरुण-तरुणी रामनामाच्या गीतांवर भक्तिभावाने थिरकत होते. धाडच्या इतिहासात एवढी मोठी गर्दी कधीच पाहायला मिळाली नसल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली.

दरम्यान, शोभायात्रा हनुमान मंदिर परिसरात पोहोचल्यावर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी उपस्थित राहून प्रभू रामाचे दर्शन घेतले. त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी वैभवराजे मोहिते यांच्या हस्ते त्यांचा शाल व रामफळ देऊन सत्कार करण्यात आला.

उत्सवाच्या यशस्वीतेसाठी सुभाष जाधव, नाना माळोदे, बाळू माळोदे, गणेश जाधव, अजय शिंदे, नीलेश चिंचोले, पवन पवार, सुनील शिंदे, सोनू वाघ, सचिन नेमाने, एकनाथ वाघ, आकाश मोरे, विशाल मोरे, ओम शिंदे, स्वप्निल शिंदे, कृष्णा शिंदे, गोपाल बोराडे, शिवराज बोराडे, ऋषिकेश बोराडे, गौरव हिंगे, ऋतिक नादरकर, अनिकेत नेमाने, वैभव सोनूने, स्वप्निल ठाकरे, ओम ठाकरे, कपिल शिंदे, राहुल रोकडे, आकाश तोटे, आशिष तोटे, विजय केळोदे, शाम तोटे, ऋषिकेश आदे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

0 9 7 1 5 5
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *