रुह्मणा विद्यालयाला माजी विद्यार्थ्यांकडून पुस्तकांची भेट; ग्रंथालय समृद्धी उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद 📚🎓

KHOZ MASTER
2 Min Read

दुसरबीड –

रुह्मणा येथील तुकाराम कायंदे माध्यमिक व उच्च माध्यमिक विज्ञान विद्यालयात अद्ययावत ग्रंथालय उभारण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या लोकसहभाग उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

नवनियुक्त प्राचार्य उद्धव गवई यांनी फेब्रुवारी महिन्यात पालक व माजी विद्यार्थ्यांना व्हॉट्सअॅपद्वारे केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अनेकांनी पुस्तके व आर्थिक मदत देण्यास सुरुवात केली आहे. 📖

या पार्श्वभूमीवर २४ मार्च रोजी माजी विद्यार्थी अनिल पोटे, विलास कऱ्हाळे, संदीप भालेराव, श्रीधर भालेराव, दीपक शेजुळ, सतीश कायंदे, राजू जायभाये, करिम शेख, संजय शिंदे आणि डॉ. रामेश्वर खर्डे यांनी विद्यालयाला भेट देत २१ कथा, कादंबऱ्या आणि प्रेरणादायी पुस्तके भेट दिली.

विशेष म्हणजे चांगेफळ येथील अनिल पोटे यांनी ही निवडक पुस्तके मुंबई येथून आणून देत उपक्रमात मोलाचा वाटा उचलला. तसेच उच्च माध्यमिक शिक्षक जी. बी. डोईफोडे यांनी शालेय उपयोगासाठी तब्बल ७१ पुस्तके भेट देऊन ग्रंथालयासाठी आतापर्यंतचा सर्वाधिक वैयक्तिक वाटा उचलला आहे.

मागील दोन महिन्यांत लोकसहभागातून सुमारे ५०० पुस्तके आणि १० हजार ५०० रुपयांची रोख मदत जमा झाली असल्याची माहिती प्राचार्य उद्धव गवई यांनी दिली.

येत्या शैक्षणिक सत्रात ग्रंथालयात किमान दोन हजार पुस्तके असावीत, असा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. परिसरातील दानशूर व्यक्ती आणि माजी विद्यार्थ्यांनी शालेय ग्रंथालयासाठी किमान एक पुस्तक किंवा स्वेच्छेने आर्थिक मदत करावी, असे आवाहनही करण्यात आले.

या प्रसंगी संस्थेचे सचिव शिवराज कायंदे, प्राचार्य, पर्यवेक्षक, प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

0 9 7 1 5 5
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *