शिवाजी महाविद्यालयात कृत्रिम बुद्धिमत्ता विषयावर राष्ट्रीय परिषद उत्साहात 🤖

KHOZ MASTER
1 Min Read

मोताळा –

स्थानिक शिवाजी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात २५ मार्च रोजी कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) या विषयावर बहुविद्याशाखीय राष्ट्रीय परिषद उत्साहात पार पडली. या परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्तेचे विविध क्षेत्रांतील उपयोग, संशोधन आणि भविष्यातील संधी यांवर सखोल चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमाचे आयोजन शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख तसेच संस्थेचे कार्यकारिणी सदस्य हेमंत डब्ल्यू. काळमेघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गजानन एन. जाधव, गुरुग्राम येथील डेटाविव टेक्नॉलॉजीजचे व्यवस्थापकीय संचालक वेदांत अहलुवालिया, तसेच अहमदाबाद येथील एच. ए. वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजयकुमार एम. यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला अॅड. शालीग्राम कळसकर, प्राचार्य डॉ. करमसिंग राजपूत, प्राचार्य डॉ. नितीन चांगोले यांची प्रमुख उपस्थिती होती.

या परिषदेत देशभरातून आलेल्या शेकडो संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी आपले शोधनिबंध सादर केले.

परिषदेच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. एस. डब्ल्यू. मामलकर, प्रा. ए. एस. मेहेरकर, डॉ. प्रवीण ठेंग, डॉ. पी. आर. चाटे, डॉ. पी. एम. गायकी, डॉ. ए. सी. ठाकूर, प्रा. भास्कर भिसे, एन. आर. राहाटे, डॉ. ए. बी. गवारे, डी. एम. ढगे आदींनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे संचालन डॉ. प्रतीक गायकी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. सुनील मामलकर यांनी केले. 👏

0 9 7 1 5 5
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *