गुटखा बंदी ; ग्रामीण भागात विक्रीची संधी..!!

Khozmaster
1 Min Read

दिपक मापारी, रिसोड तालुक्यातील ग्रामीण भागात गुटखा विक्री जोमात. कर्करोगास नियंत्रण ठरणाऱ्या गुटख्याच्या विक्रीवर महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेली असताना ही बंदी केवळ कागदावरतीच मर्यादित उरली आहे.बंदीच्या काळात सर्वत्र गुटख्याची विक्री जोमात वाढताना दिसून येत आहे. ग्रामीण परिसरात प्रत्येक खेड्यात किराणा दुकान, पान टपरी, आदी ठिकाणी गुटख्याच्या पुड्या विक्रीसाठी आढळून येत आहे. कुणाचीही भीती न बाळगता गुटख्याची खुल्या विक्री सुरू आहे. होलसेल गुटखा विक्रेते हे सर्व खेड्यात व गावात प्रत्येक दुकानावर गुटख्याच्या पुड्या मोटर सायकल वरून पोहोचवून देण्याचे काम करीत आहेत. मात्र त्यांच्यावर कोणतीच कारवाई होताना दिसून येत नसल्याने चित्र पाहावयास मिळत आहे. महिला पुरुष तथा शालेय विद्यार्थी सुद्धा मोठ्या प्रमाणात या गुटख्याच्या आहारी गेलेले आहेत. कर्करोगाचा वाढता धोका लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने धाडसी निर्णय घेत राज्यात गुटखा बंदीचा निर्णय घेतला होता. कठोर अमलबजावणीसाठी कायदा सुद्धा निर्माण केला आहे परंतु अन्न व औषधी प्रशासन विभाग व पोलीस प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. दुर्लक्षणामुळे गुटखा विक्री जोमात सुरू आहे. अधून मधून कारवाईत गुटख्याच्या पुड्या जप्त करण्यात आल्याचे दिसत असले तरी थातूरमातूर कारवाईनंतर पुन्हा गुटखा विक्री कडे दुर्लक्ष होत आहे..

0 9 3 7 2 5
Users Today : 6
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *