सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील सावळदबारा परिसरात लम्पी त्वचारोगाचा धोका अजूनही टळताना दिसत नसून, बाधित गुरांचे मृत्युसत्र थांबताना दिसत नसून पुन्हा डाभा येथील एका शेतकऱ्याच्या बैलाचा लम्पी त्वचारोगामुळे मृत्यू झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे.औरंगाबाद-जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर वसलेल्या सोयगाव तालुक्यातील सावळदबारा परिसरात महिनाभरापूर्वी लम्पी त्वचारोगाने शिरकाव केलेला आहे. या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने बाधित क्षेत्र म्हणून घोषित झालेल्या नादातांडा पशुवैद्यकीय केंद्राअंतर्गत येणाऱ्या परिसरात वेगाने लसीकरण मोहीम राबवून, परिसरातील शंभर टक्के गुरांचे लसीकरणही केले आहे, मात्र त्यानंतरही या परिसराला पडलेला लम्पी त्वचारोगाचा विळखा अजूनही सैल होताना दिसत नसून अजूनही लम्पी त्वचारोग बाधित गुरे दगावण्याचे सत्र थांबताना दिसत नाही. दरम्यान मोलखेडा, डाभा,नादातांडा व सावळदबारा येथील शेतकरी अमृत जमाले याचां एक बैल दगावला आहे.लम्पी त्वचारोगाने बाधित झाली होती. सदरील बाधित बैलावर सावळदबारा पशुवैद्यकीय केंद्राचे सहायक पशुवैद्यकीय अधिकारी काकडे यांच्या माध्यमातून वैद्यकीय उपचार करण्यात येत होते.या बाधित डाभा येथील शेतकऱ्यांचा बैलचा मृत्यू झाला आहे. बाधित बैलाचा मृत्यू झाल्याने परिसरातील पशुपालक व शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे.