सोयगाव प्रतिनिधी :गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील घाणेगाव तांडा येथील सरपंचपती सुरेश चव्हाण(सामाजिक कार्यक्रर्ता) यांची मुलगी दिव्या सुरेश चव्हाण घाणेगांव तांडा अशा ग्रामीण भागातील कु.दिव्या सुरेश चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा जळगाव कराटे स्पर्धेत सिल्वर मेडल मिळवून घाणेगांव तांड्याचे नाव व सोयगाव तालुक्याचे नाव उज्वल केले. जळगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत दिव्या चव्हाण या विद्यार्थ्यांनीने भाग घेतला होता.यामध्ये चांगल्या खेळाचे प्रदर्शन करीत सिल्वर मेडल चा मान मिळवला.आई व वडिलांचे नाव उज्वल केले आहे.स्वच्छ सुंदर ग्राम स्पर्धेत दिल्लीपर्यंत गावचा डंका मिरविलेल्या घाणेगाव तांडा गावाने या निमित्ताने आणखी एकदा उत्तुंग यश मिळविले आहे. या खेळासाठी वडील सुरेश चव्हाण, आई सौ.रत्नाताई चव्हाण सरपंच,यांनी दिव्या शुभेच्छा दिल्या. यावेळी समीरसेठ नगराध्यक्ष सिल्लोड,सपोनि देवीदास वाघमोडे,माजी सभापती धरमसिंग चव्हाण,उपसरपंच हिरा जाधव, लक्ष्मण पवार, गोंविद महाराज, ग्रामसेवक एस.ए.रणजिते,पत्रकार सुनील चव्हाण, जेष्ठ पत्रकार तथा तालुका अध्यक्ष सोयगाव गोकुळसिंग राजपूत, नामदेव चव्हाण, रत्नाकर उंमरे,सुखदेव गवळे,इतर मान्यवरांनी कु दिव्या वर शुभेच्छा वर्षाव केला.