सोयगाव : प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील व सावळदबारा परिसरातील शेतकरी बांधव-भगिनींनी २० मे २०२६ पूर्वी आपला फार्मर आयडी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन सोयगाव कृषी विभागाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी भारत कासार यांनी केले आहे. कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी विलंब न करता नोंदणी करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात १४ नोव्हेंबर २०२४ पासून ग्रीस्टॅक योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून १५ एप्रिल २०२५ पासून सर्व कृषी योजनांसाठी फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तत्काळ पुढाकार घेणे आवश्यक आहे.
सोयगाव तालुक्यातील तसेच सावळदबारा परिसरातील अनेक शेतकरी अद्याप नोंदणीपासून वंचित आहेत. अशा शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या सेवा सुविधा केंद्रावर जाऊन किंवा ग्रीस्टॅक पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
भविष्यात बियाणे, खते, औषधे यांसारख्या कृषी निविष्ठा तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अत्यावश्यक राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे.
नोंदणी प्रक्रियेत कोणतीही अडचण आल्यास संबंधित कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे.काही अडचण आल्यास सोयगाव कृषी विभाग यांच्या कडे संपर्क साधावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी भारत कासार यांनी केले आहे
Users Today : 22