डोणगाव
परिसरातील आरोग्य
व्यवस्थेला हादरा देणारा प्रकार उघडकीस आला असून, कोणतीही वैध पदवी किंवा अधिकृत परवाना नसताना काही व्यक्तींकडून पॅथॉलॉजी लॅब चालवल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रक्त व लघवी तपासणीसारख्या महत्त्वाच्या वैद्यकीय चाचण्या अप्रशिक्षित व्यक्तींमार्फत केल्या जात असल्याने रुग्णांच्या जीवाशी थेट खेळ
सुरू असल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे.
नियमांनुसार पॅथॉलॉजी लॅब चालविण्यासाठी एमडी पॅथॉलॉजिस्ट किंवा डीएमएलटी पदवीधारक असणे आवश्यक आहे, तसेच तपासणी अहवालावर अधिकृत डॉक्टरांची स्वाक्षरी बंधनकारक असते; मात्र डोणगावातील काही लॅबमध्ये वैद्यकीय शिक्षण नसलेल्या व्यक्तींकडूनच नमुने गोळा करून तपासणी अहवाल तयार केले जात असल्याचा आरोप होत आहे. काही ठिकाणी डिजिटल स्वाक्षऱ्यांचाही गैरवापर होत असल्याची चर्चा आहे. चुकीच्या अहवालांमुळे रुग्णांवर चुकीचे उपचार होण्याची शक्यता नाकारता येत
योग्य पदवीधारक व्यक्तींनीच पॅथॉलॉजी रिपोर्ट दिला पाहिजे. त्यामुळे रोगाचे अचूक निदान व योग्य उपचार होण्यास मदत होते. संबंधित प्रकरणाची माहिती वरिष्ठ कार्यालयाला देऊन आवश्यक कारवाई केली जाईल.
– डॉ. राम गायकवाड, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, डोणगाव
नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी संबंधित सर्व लॅबची चौकशी करून बोगस केंद्रांवर कारवाईची मागणी केली आहे.
डोणगावातील बोगस लॅबवर कारवाईची मागणी
डोणगाव परिसरातील अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबविरोधात नागरिकांचा संताप वाढला आहे. अधिकृत पदवी व नोंदणी नसतानाही काही ठिकाणी सर्रास लॅब सुरू असल्याचा आरोप होत आहे. मुख्य रस्ते व रुग्णालय परिसरात सुरू असलेल्या या प्रकाराकडे आरोग्य प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची टीका होत आहे. सर्व लॅबची तत्काळ चौकशी करून बोगस लॅब सील कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशार नागरिकांनी दिला आहे. दरम्यान, प्रशासन यावर काय निर्णय घेत याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.
Users Today : 29