शेतकऱ्यांच्या हितासाठी मेहकर येथे निर्णायक बैठक संपन्न!

KHOZ MASTER
1 Min Read

लोणार 

सदर बैठकीत शेतकऱ्यांच्या विविध गंभीर प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. विशेषतः
डीएपी खताचा तुटवडा
एमआरपीपेक्षा जास्त दराने विक्री
खतांसोबत जबरदस्ती लिंकिंग शेतकऱ्यांच्या नावावर बनावट खरेदी
कंपन्यांची दादागिरी व विक्रेत्यांवरील आर्थिक दबाव

या प्रकारांवर कठोर भूमिका घेत संबंधितांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या की, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. या बैठकीस किशोर काळे,तालुका कृषी अधिकारी, मेहकर
आर. एफ. शिदोरे,तालुका कृषी अधिकारी, लोणार
उद्धव काळे, कृषी अधिकारी तथा गुणनियंत्रण निरीक्षक, मेहकर
अनिल सांगळे,कृषी अधिकारी तथा गुणनियंत्रण निरीक्षक, लोणार
विवेक देशमुख ,उप कृषी अधिकारी, मेहकर
जी. डी. तुपकर,उप कृषी अधिकारी, जानेफळ

यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी व विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकरी हा देशाचा कणा आहे…
त्याच्या घामाचा गैरफायदा घेणाऱ्यांना कोणतीही माफी नाही!

शेतकऱ्यांना योग्य दरात खत उपलब्ध व्हावे, कृत्रिम टंचाई थांबावी आणि विक्रेते व शेतकरी दोघांनाही न्याय मिळावा यासाठी पुढील काळातही सातत्याने पाठपुरावा केला जाणार आहे.

0 9 7 2 9 2
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *