ऑनलाईन औषध विक्रीविरोधात लोणार तालुक्यात मेडिकल कडकडीत बंद; काळ्या फिती लावून केमिस्टचा एल्गार!

KHOZ MASTER
2 Min Read

लोणार

अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या (AIOCD) देशव्यापी आवाहनानुसार, ऑनलाईन औषध विक्री, इंटरनेट फार्मसी आणि ई-पोर्टल प्रणालीच्या विरोधात आज बुधवार, २० मे रोजी पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’ आंदोलनाला लोणार तालुक्यात १०० टक्के उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील सर्व मेडिकल दुकाने कडकडीत बंद ठेवून औषध विक्रेत्यांनी या धोरणांचा तीव्र निषेध केला. या आंदोलनांतर्गत लोणार तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांना तहसीलदार मा. भूषण पाटील यांच्यामार्फत मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

काळ्या फिती बांधून शासनाचा निषेध

वरिष्ठ केमिस्ट नंदूभाऊ मापारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज तालुक्यातील सर्व केमिस्ट बांधव एकत्र आले होते. शासनाच्या अन्यायकारक धोरणांमुळे स्थानिक औषध विक्रेत्यांचे अस्तित्व धोक्यात आले असून, याचा निषेध म्हणून सर्व पदाधिकाऱ्यांनी व केमिस्ट बांधवांनी हाताला काळ्या फिती बांधून आपला तीव्र संताप व्यक्त केला. संपूर्ण तालुक्यात आंदोलन अत्यंत शांततापूर्ण व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले.

पंतप्रधानांना पाठवलेल्या निवेदनात काय आहे?

देशात आणि राज्यात बेकायदेशीर रित्या सुरू असलेली इंटरनेट फार्मसी व ऑनलाईन औषध विक्री तत्काळ रोखण्यात यावी, अशी प्रमुख मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडे यापूर्वीही अनेकवेळा पाठपुरावा करूनही कोणताही सकारात्मक निर्णय न झाल्याने अखेर देशातील औषध विक्रेत्यांना रस्त्यावर उतरावे लागले आहे, याकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले.

सुलतानपूर केमिस्ट असोसिएशनचाही सक्रिय सहभाग

या आंदोलनात लोणारसह सुलतानपूर येथील केमिस्ट बांधवांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावली. सुलतानपूर केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष भागवत पाडघान, उपाध्यक्ष मोईन खान, सचिव जय देसाई, कोषाध्यक्ष विकास गाडे व खजिनदार शेख लतीफ यांच्यासह सर्व स्थानिक विक्रेते आंदोलनात सक्रिय सहभागी झाले होते.

या पदाधिकाऱ्यांची होती उपस्थिती

निवेदन देताना सिनियर केमिस्ट नंदुभाऊ मापारी सोबत लोणार तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी अफसर खान, कैलास बचाटे, ॲड. रिजवान ज
जड्डा, सुमित बोरा, पंजाब शिंदे, ई.सी. सदस्य चंदन दरोगा यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य केमिस्ट बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुक्यातील सर्व औषध विक्रेत्यांनी दाखवलेल्या या अभूतपूर्व एकतेमुळे आजचा ‘बंद’ पूर्णपणे यशस्वी ठरला.

0 9 7 4 1 3
Users Today : 32
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *