अन् खेळाडूंसोबत ‘बासरू’ धावू लागले ## चांदूर बाजारातील फिजिकल अकॅडमीत घडला अनोखा प्रसंग

KHOZ MASTER
1 Min Read

जसापूर : स्व. केशवदादा टोम्पे मोफत फिजिकल अकॅडमी, संलग्नित श्री हनुमान क्रीडा मंडळ, चांदूर बाजार येथे शनिवारी पहाटेच्या मॉर्निंग फिजिकल वर्कआउट दरम्यान एक अनोखा आणि प्रेरणादायी प्रसंग घडला.

अकॅडमीचे खेळाडू नेहमीप्रमाणे टोम्पे कॉलेज ते रेल्वे स्टेशन या मार्गावर रनिंगचा सराव करत असताना अचानक एका गोमातेने खेळाडूंसोबत धावण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे, गोमाता टोम्पे कॉलेजपासून रेल्वे स्टेशनपर्यंत खेळाडूंसोबत धावत गेली आणि तेथून पुन्हा खेळाडूंसोबतच टोम्पे कॉलेजपर्यंत परत आली.

जणू काही तीही अकॅडमीच्या शिस्तबद्ध सरावाचा भाग बनली होती. हा अनोखा प्रकार पाहून परिसरातील मॉर्निंग वॉकसाठी आलेले नागरिक आश्चर्यचकित झाले. अनेकांनी हा प्रसंग आपल्या मोबाईलमध्ये कैद करत आनंद व्यक्त केला.

या अनपेक्षित पण हृदयस्पर्शी घटनेमुळे खेळाडूंमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून परिसरात या प्रसंगाची मोठी चर्चा रंगली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *