दिपक मापारी, रिसोड काढणीला आलेले पीक भिजले,घोटा चिखली परिसरात सोयाबीन भिजले,शासनाची मदत गुलदस्त्यात.. तालुक्यातील घोटा चिखली परिसरात दसऱ्याच्या मुहूर्तावर सोयाबीन पीक हातचे गेले अशी चर्चा रंगत आहे. ५ ऑक्टोंबर रोजी दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी ६ वाजेपासूनच पावसाचे आगमन झाले. ज्यामुळे शेत शिवारात वाळत असलेली सोयाबीन पिक भिजले आहे. त्यामुळे घोटा, चिखली सह परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. दसऱ्याचा शुभ मुहूर्त शेतकऱ्यासाठी अशुभ होतो झाला की काय असा सवाल उमटत आहे.यावर्षी घोटा, चिखली, सह परिसरातील व्याड, वनोजा, कवठा, परिसरासह शेत शिवारातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नगदी पीक म्हणून सोयाबीन पीक घेतले आहे. सध्याच्या परिस्थितीत सोयाबीन पीक हे कापणीला आले आहे. परिसरातील शेतकरी सोयाबीन कापणीसाठी रोजमजूरदार सुद्धा पहात आहेत. सोयाबीन कापणी साठी शेतकरी सध्या तळमळ करीत आहे. त्यातच मजूदार सोयाबीन काढण्यासाठी प्रती बॅग ३हजार दोनशे रुपये भाव घेत असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. सध्या सोयाबीन भावाचे दरही घसरले आहे. त्यामुळे सोयाबीन लागवडीचा खर्च निघत नसल्याची अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यातच साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून ओळख असणाऱ्या दसऱ्याच्या सणाच्या दिवशीच जोरदार पाऊस झाला असून शेत शिवारातील सोयाबीन पीक भिजले आहे. त्यामुळे शेतकरी हजबळ झाला असून शुभ मुहूर्त शेतकऱ्यासाठी अशुभ झाला की काय ? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे..
घोटा, चिखली, कवठा,सह परिसरात सध्या शासनाच्या वतीने कोणतीच शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. पिक विमा, अतिवृष्टी, अनुदान हे सध्या गुलदस्त्यातच आहे. राजकीय पुढारी केवळ आपल्या मोठमोठ्या सभा घेण्यातच मग्न आहेत. राजकीय क्षेत्रात गट निर्माण झाले असून आपलाच गट श्रेष्ठ हे सिद्ध करण्यात आमदार, खासदार यांच्यासह नेते मंडळी कामाला लागली आहे. शेतकरी मात्र अडचणीत दाबूनच राहात आहे. ऐन सणाच्या दिवशी शेतकऱ्यांना आनंद होण्याऐवजी दुःख सहन करण्याची वेळ आली आहे. निसर्गही शेतकऱ्यांची थट्टा करीत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे..
Users Today : 5