औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
औरंगाबाद येथील पैठण रोड श्रीकृष्ण मंदिर महानुभाव आश्रम येथे महानुभाव युवा संत संमेलनाचे दोन दिवसीय आयोजन करण्यात येणार आहे यात आयोजनात २०० पेक्षा जास्त युवा संत सहभागी होणार आहे. शांतता प्रिय बाराव्या शतकात स्थापन झालेला महानुभाव धर्म या धर्माच्या प्रचार तसेच प्रसार अधिक व्हावा यासाठी औरंगाबाद येथील पैठण रोड वरील श्रीकृष्ण मंदिर महानुभाव आश्रम येथे युवा संत समेलनाची आयोजन आठवण ९/१०/२२रविवारी रोजी करण्यात येणार आहे या संमेलनात महाराष्ट्रभरातून दोनशेहून अधिक युवा संत सहभागी होणार आहे. या संमेलनात महानुभव पंथ भविष्याच्या दृष्टीने ठराव पारित केले जाणार आहे. यात देशप्रेम राष्ट्रकर्तव्य सर्वधर्म समभाव सामाजिक कर्तव्य धार्मिक संघटन या दृष्टीने मंचन केली जाणारअसल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात केंद्रीय अर्थमंत्री डॉ. भागवत कराड, पालकमंत्री संदिपान भुमरे, मंत्री अतुल सावे, आमदार प्रदीप जैस्वाल, माजी महापौर नंदकुमार घोडोले सहभागी होणार असून सत्राच्या आरंभी महानुभाव पंथाने स्वीकारलेल्या नूतन ध्वजाचे भव्य ध्वजारोहण होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे यावेळी महंत घुगे बाबाजी, साहित्याचार्य संतोषमुनी शास्त्री दिवाकर बाबाजी महानुभाव सुदर्शन महाराज कपडे, जितेंद्रमुनी कपर्ट विलासराज वि विद्वांस प्रदीपराज शेवलीकर, मोहन राजकपटे धर्मकुमार मोहन बाभूळगावकर, अजयकुमार कानडे किरण पाटील हे उपस्थित होते अशी माहिती शिव व्याख्याते प्रवीण जगताप यांनी दै.खोजमास्तर न्यूज चे प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत याच्याशी बोलताना सांगितले.