औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत औरंगाबाद,पंतप्रधान स्व निधी वित्तीय समावेशन आणि वित्तीय सहायता अभियानाअंतर्गत किमान शहरातील तीन हजार स्ट्रीट वेंडर यांना कर्ज वितरण केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते करण्यात आले. स्व निधी मध्ये केंद्र सरकार सात टक्के व्याज भरते आणि लाभार्थ्यांना केवळ चार टक्के व्याज भरावे लागते. रस्त्यावर व्यवसाय करणारे गोरगरीब यांना सावकारीच्या पाशातून मुक्त करण्यासाठी पी. एम एम स्व निधी योजना ही अत्यंत महत्वपूर्ण आहे असे राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी पी एम स्व. नीची कर्ज वितरण मेळाव्या प्रसंगी म्हटले आहे.भारतीय स्टेट बँक आणि औरंगाबाद महानगरपालिका यांच्या वतीने संत एकनाथ रंगमंदिर उसमानपुरा मध्ये कर्ज वितरण आणि लाभाथ्र्यांचे कर्ज मंजुरी पत्र या मेळाव्याप्रसंगी लाभार्थ्यांना देण्यात आले या मेळाव्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण स्टेट बैंक ऑफ इंडियाचे विभागीय प्रबंधक रवी कुमार वर्मा, औरंगाबाद महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर अभिजीत चौधरी, रोहित काशाळकर जिल्हा ग्रामिण बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार यांच्यासह मोठया प्रमाणात लाभार्थी उपस्थित होते.