सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत...खरीपाची सोयाबीन ही संकटात उत्पादनात येणार घट सोयगाव .अस्मानी व सुलतानी संकटाने बळीराजाचे कंबरडे मोडले असूनसत तच्या पावसाने खरीपातील पीकांचे अतोनात नुकसानीबरोबरच सोयाबीन वर्गीय पिके पावसाच्या कचाट्यात सापडले असून सततच्या पावसामुळे शेतातच सढण्याची वेळ आली आहे . पावसामुळे पिके कोमात गेली असून कापुसावर अळीचा प्रादुर्भाव दिसत आहे .आता तर कपाशीवर अळीचा प्रादुर्भाव झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे खरीपातील मका , सोयाबीन, कपाशी हे मुख्य पीक असून या सोबतच भेंडी ,मिरची ,टोमॅटो लागवड केली जाते .परंतु यंदा सुरुवातीपासूनच पावसाचे धुमसान चालु असल्याने पीकांची हवी तशी वाढ झालेली नाही. यास मका अपवाद असली तरी अनेक भागातील शेतात पावसाचे पाणी साचल्याने पिक पिवळी पडली असून जास्त पाण्यामुळे सोयाबीन, मका व कापूस खराब होत आहे.गुरुवार व शुक्रवार परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली दरम्यान, पाण्यामुळे सोयाबीन पिक खराब होऊ लागल्याने झाडांना नञ , स्फुरद व पालाश या घटकांचे योग्य असे अन्न द्रव्य भेटत नसल्याने प्रतिदीन झाडांची रोग प्रतिकारक शक्ती घटू लागली आहे. तसेच कपाशीवर वेगवेगळे किटक व रोग हल्ला चढवीत असल्याने पिकांची वाताहत होत आहे. शेतकरी महागडी औषधे फवारणी करून आपले पीक वाचवण्याचा प्रयत्न करत असून,औषधी फवारणीसाठी २० लिटर पंपाच्या यंत्राने फवारणी करणारे ५० रुपये पंपाप्रमाणे शेतकऱ्यांकडून पैसे आकारत आहे. दरम्यान, सद्या टोमॅटो,भेंडी, कांदा या भाजीपाला पिकावर अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला असून अळ्या शेंडा व पाने कुरतडत असुन पिके आपोआप पिवळी पडून सुकत आहे. त्यामुळे या संकटांना तोंड देता देता शेतकऱ्यांचे अक्षरशः नाकी नऊ आले असून अस्मानी व सुलतानी संकटांनी बळीराज्याचे कंबरडेच मोडले आहे.उत्पादनात येणार गट यावर्षी सतत पडणाऱ्या पावसामुळे पिकांची वाढ खाली, वर झाल्याने तसेच चार ते पाच दिवसपासून सूर्यदर्शन न झाल्याने सोयाबीन खराब होत असून उत्पादनात घट येणार आहे यावर्षी शेतात इतर पिकांना फाटा देऊन सोयाबीन लागवड केली पण सततच्या पावसाने सोयाबीन खराब झाले असून जनावरांना घालण्याची वेळ आली आहे, त्यामुळे नेमके कोणती पिके घ्यावी हा प्रश्न शेतकऱ्यांपर्यंत पडला आहे त्यामुळे केलेला खर्चही आता निघणार नसल्याने आता तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला आहे.
जेष्ठ नागरिक तथा शेतकरी
रामभाऊ वारांगणे मोलखेडा ता.सोयगाव