पैठण येथे ६६ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिना निमित्त डॉ.बाबासाहेब धम्म रॅली काढत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मंगलमय वातावरनात अभिवादन

Khozmaster
2 Min Read

औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूतऔरंगाबाद जिल्ह्यातील तालुका पैठण येथे ६६ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन तसेच प्रियदर्शनी सम्राट अशोका विजयादशमी निमित्ताने दि.५/१०/२२ बुधवार रोजी सकाळी ९.३० वाजता शहरातील पावर हाऊस येथिल श्रावस्ती बुध्द विहार ते पैठण बसस्थानक परिसरातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यापर्यंत समस्त बौद्ध समाज बांधवांच्या वतिने धम्म रेली काढन्यात आली या धम्म रॅलीमधे आलेल्या मिम अनुयायी तसेच ऊपासक ऊपासीकानी व लहान बालक व बालकांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून उत्साहाने सहभागी झालेले दिसून आले.

या वेळी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या निमित्ताने पुज्यनिय भ शाक्यपुत्र राहूल, भंते भारद्वाज, भंते आनंद यांच्या प्रमुख उपस्थितीमधे सामुहिक बुद्ध वंदना घेन्यात आली शहरातील पावर हाऊस परिसरातील श्रावस्ती बौध्द विहारापासून सुरवात झालेल्या या आभिवादन रॅलीमधे तथागत गौतम बुध्द व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणुक काढण्यात आली व बुध्दम शरनम गच्छामीच्या निनादात काढन्यात आली व या मिरवनुकीमधे सर्व महिलांनी पांढरी साडी व पुरुषानी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेले होते सदरिल आभिवादन रैली

ही शहरातील नेहरू चौक मार्गे होत ग्रिन चौक भाजी मार्केट परिसरातून शिवाजी महाराज चौका पासून बसस्थानक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आली आसता यावेळी भंते भारद्वाज यांनी सर्व समाज बांधवांना बुध्दधम्मा विषयी सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी राष्ट्रवादीचे चे नेते रावसाहेब आडसूल, दत्ता गोर्डे, राजू गायकवाड, डॉ. पंडित किल्लारीकर, जालिंदर आसूल, आरुन काळे, जितू परदेशी मिलिंद बनकर, बजरंग लिंबोरे, फाजल टेकडी, जगन्नाथ साळवे, स्वप्निल साळवे भास्कर दाभाडे आरुन बल्लाळ, नंदकिशोर मगरे संजय खडसन सोमनाथ निकाळजे, जे.ई. निसरगंध जे ई.संदिप एडके, दशरथ आडसुळ, गंगाराम पंडित, कल्याण मगरे, तक्षशिला महिला मंडळ, अशोक मगरे, पंकज वाघवसे विजय खडसन, भाऊसाहेब खुटेकर, गंगाधर म्हस्के, अविनाष मिसाल, भद्रे सर राहुल गिरे, बनकर, दारासिंग, रविंद्र पहिलवान, रवि हिवराळे, सरवि मगर अँड पंकज काकडे, विजय घायतडक कैलास बर्फे सुरेश वाहुळ, आदीसह मोठ्या संख्येने महिला पुरुष व समाज बांधवाची उपस्थिती होती.अशी माहिती साप्ताहिक आपले ज्ञानपंखचे संपादक दशरथ सुरडकर यांनी बोलताना सांगितले

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *