ग्रामीण भागात सध्या सोयाबीन हे एकच मिशन..!!

Khozmaster
2 Min Read

दिपक मापारी, रिसोड गतवर्षी सोयाबीनला मिळालेला विक्रमी भाव पहाता आपसूकच यावर्षी सोयाबीनचा पेरा वाढला आहे. रिसोड तालुक्यातही सर्वाधिक पेरा सोयाबीनचाच आहे. सोयाबीन सोंगणीचे काम सध्या सुरू आहे. बदललेले वातावरण पाहता लवकरात लवकर सोयाबीन सोंगुन तीच गंजी सुरक्षित झाकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. इतर सर्व काम, सर्व कार्यक्रम बाजूला ठेवून सध्या एकच सोयाबीन हे एकमेव मिशन ग्रामीण भागात राबविले जात आहे.मागच्या वर्षी परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाचे खूप नुकसान केले होते. हातातोंडाशी आलेल्या नुकसान झाल्याने शेतकरी चांगलेच हतबल झाले होते. दरम्यान गतवर्षीचा अनुभव पाहता यावर्षी शेतकऱ्यांनी वातावरणाचा अंदाज घेत सोयाबीन सोंगणनीवर भर दिला आहे. शेतकरी कुटुंबातील लहान मोठा प्रत्येक सदस्य शेतमजूर असे सर्वच शेतात दिसतात त्यामुळे गावे दिवसा ओस पडत आहेत. एवढेच नव्हे तर तालुका मुख्यालयी असलेले शासकीय कार्यालये, तहसील, पंचायत समिती, ग्रामपंचायत, अश्या ठिकाणी नेहमी पहायला मिळणारी गर्दी देखील ओसरली असून बाजारपेठेतही शुकशुकाट आहे. कित्येक ठिकाणी सुरू असलेले बांधकाम देखील मजुरां अभावी बंद पडले आहे. सोयाबीन सुगीत मिळणारी मजुरी जास्त असल्याने इतर मजुरी कामे बंद असून सगळीच गर्दी शेतामध्ये दिसून येत आहे..चिमुकले शाळेत..ग्रामीण भागात सोयाबीन कापणीचा हंगाम सुरू आहे. या हंगामात घरातील चिमुकल्या मुलांना एक तर आजी आजोबा जवळ किंवा मग शाळेत जाणाऱ्या मुलासोबत शाळेत ठेवले जात आहे. जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या बहिणी सोबत किंवा भावासोबत त्यांची चिमुकले भावंडे शाळेत येऊन बसत आहेत. सोयाबीनचा हंगाम असल्याने शिक्षकांनाही याची जाणीव आहे. त्यामुळे ते देखील सध्या काही म्हणत नाहीत..

 

0 9 3 7 2 5
Users Today : 6
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *