रिसोड ता. प्रतिनिधी रिसोड शेतकरी संतप्त..तालुक्यात जुलै ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले. नुकसानीची तक्रार शेतकऱ्यांनी ७२ तासाच्या आत विमा कंपनीकडे केली. मात्र त्यानंतर दोन महिने लोटून गेले तरी अद्याप पंचनामे करण्यात आले नसल्याने घोटा, चिखली, येथील शेतकऱ्याकडून संताप व्यक्त केला जात आहे..अतिवृष्टीमुळे शेती पिकात पाणी साचून राहिले, ओढ्या काठावरील शेतातील पिके वाहून गेली. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे ऑनलाइन पद्धतीने वेळेत तक्रार दाखल केली. त्यानंतर कंपनीच्या प्रतिनिधीकडून नुकसानीचे पंचनामे करणे क्रमप्राप्त असताना दोन महिनाभरानंतर देखील पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण केली नसल्याचे अनेक शेतकऱ्यांमधून सांगितले जात आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी पिकांना पिक विमा कवच मिळावे, यासाठी शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभाग घेतला. नुकसानानंतर तक्रार दाखल करूनही पंचनाम्यास विलंब होत असल्याने मदत मिळेल की, नाही असा प्रयत्न शेतकरी उपस्थित करीत आहे. घोटा, चिखली, गावासह परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसानीचे अद्याप पंचनामे पूर्ण करण्यात यावे अशी मागणी होत आहे..मी घोटा येथील रहिवासी असून माझी चिखली शिवार मध्ये जवळपास एक हेक्टर शेतजमीन आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे अगदी 70 ते 80% पर्यंत शेतमालाचे नुकसान झालेले आहे. खोल भागावरील सोयाबीनचे पीक अगदी कापायची ही गरज राहिलेली नाही.याबाबत पिक विमा कंपन्यांना वारंवार तक्रारी करूनही कसल्याही प्रकारचा प्रतिसाद अद्याप पर्यंत मिळालेला नाही.अगदी निकडीच्या वेळी पैशाची जमवाजमव करून पिक विमा भरला होता आणि आता एवढ्या मोठ्या प्रमाणात शेत पिकाचे नुकसान होऊनही जर शेतकऱ्याच्या बांधावर विमा कंपन्यांचे प्रतिनिधी येऊनही बघायला तयार नसतील आणि सरकारही कमिशनच्या भीतीपोटी कंपन्यांना धाक देण्यास धजावत असेल तर मग शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी कोणाकडे दाद मागावी.??दिपक मापारी, तक्रारदार शेतकरी
Users Today : 6