बुलडाणा अर्बनच्या वतीने बुलडाणा अर्बन फॉरेस्ट मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

Khozmaster
3 Min Read

बुलढाणा– बुलडाणा अर्बनच्या वतीने बुलडाणा अर्बन फॉरेस्ट मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावल्याने तथा राष्ट्रीय स्तरावरचे स्पर्धकांच्या उपस्थितीने ‘बोबा फॉरेस्ट’ आज गजबजून गेले होते.

 

ज्ञानगंगा अभयारण्याच्या परिसरात रविवार ९ ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेल्या फॉरेस्ट मॅरेथॉन स्पर्धेत महिला गटामध्ये माथूरी निमजे, अश्वीनी काटोले तर पुरुष गटात निखील यमनेरे व गणेश दरबास्तरबार यांनी प्रथम क्रमांक प्राप्त करून मोहोर उमटविली.

 

बुलडाणा अर्बन फॉरेस्ट मॅरेथॉन स्पर्धेला बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, ब्रॅण्ड अॅम्बेसीडर नितीन घोरपडे, डॉ. सुकेश झंवर, नितीन चौधरी, रविंद्र काळवाघे, वनक्षेत्रपाल लोखंडे यांनी हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेला नक्षत्रबन येथून प्रारंभ झाला. या स्पर्धेमध्ये ४० वर्षाच्या आतील व वरील वयोगटात जवळपास १५०० स्पर्धकांनी सहभाग घेऊन ही १० किलोमीटर धावण्याची स्पर्धा वेळेत पूर्ण केली…

 

स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला आ. संजय गायकवाड, बुलडाणा अर्बनचे संस्थापक राधेश्याम चांडक, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद चावरीया, वनक्षेत्रपाल लोखंडे, आयर्न मॅन नितीन घोरपडे, नितीन चौधरी, अॅड. शरद राखोंडे उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते विजयी सर्व स्पर्धेकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच ही स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सहभागी सर्व धावकांना बुलडाणा अर्बनच्या वतीने पदके देण्यात आली. स्पर्धेला मदत करणाऱ्या सर्व पंच व अधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देण्यात आले.

 

स्पर्धेत १० किमी शर्यतीत ४० वर्षाआतील महिला गटात प्रथम क्रमांक अश्विनी काटोले, द्वितीय क्रमांक बसंती जामरा तर तृतीय क्रमांक रिया चोपडे यांनी प्राप्त केला. ४० वर्षावरील पुरुष गटात प्रथम क्रमांक गणेश दरबास्तरवार द्वितीय क्रमांक क्रीष्णा भद्रेवार, तृतीय अजबराव साखरे यांनी पटकावून विजय संपादन केला. २१ किलोमीटर ज्युनिअर पुरुष गटात प्रथम क्रमांक कुमार भगतसिंग, द्वितीय वैभव काळवाघे, तृतीय अविनाश लवगे, तर महिला गटात प्रथम क्रमांक प्रज्ञा सरकटे, द्वितीय प्रियंका मंत्री, सिनीअर पुरुष गटात प्रथम क्रमांक उमेश घुले, द्वितीय क्रमांक ललितकुमार बन्हाडे, तृतीय क्रमांक महेश महाजन तर महिला गटात प्रथम क्रमांक कल्याणी सतेजा, द्वितीय क्रमांक रती महाजन, तर तृतीय क्रमांक किर्ती काबरा यांनी पटकावला आहे.

तसेच स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतले त्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. स्पर्धेत सहभागी धावकांसाठी चोख व्यवस्था करण्यात आली होती. धावनपथावर ठिकठिकाणी पाणी, फळे, बिस्कीट, चॉकलेटस, चिक्की स्टॉल लावण्यात आले होते. धावकांनी या दरम्यान पर्यटनाचा सुद्धा आस्वाद घेतला. सहकार विद्या मंदिर च्या विद्यार्थी बॅण्ड पथकाने संगीतातील विविध प्रकाराचे प्रदर्शन केले. तसेच वन्य प्राण्यांचा वेश परिधान करून जंगल बचाव संदेश या माध्यमातून दिला. बक्षिस वितरण कार्यक्रमाचे प्रास्तविक व समारोप बुलडाणा अर्बनेच कार्यकारी संचालक डॉ. सुकेश झंवर यांनी केले. भविष्यात बुलडाण्यात होणाऱ्या या मॅरेथॉन स्पर्धेसाठी रोख रक्कम बक्षिसे ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. संचलन संजय कुळकर्णी यांनी केले.

 

0 9 4 2 4 9
Users Today : 6
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *