प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत गावात घरे पुजने झाले बंद आता शांततेत दिवाळी साजरी करा प्रा.जीवन कोलते यांचे आवाहन सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे रात्रीच्या सुमारास माघील काही महिन्यात घरे पुजने,लिंबू मिरची काळी बाहुली वैगरे व नि:वस्र इसम दिसने अशा अंतर्गत अफवांना जोर आला होता.परिणामी गावात भितीचे वातावरण तयार झाले होते. लहान मुलं व खास करून महिलांवर खूप संभ्रम व करणी कवटाळ यासारख्या गोष्टींना ऊत आला होता परंतु प्रा.जीवन कोलते(सामाजिक कार्यकर्ते)यांनी तात्काळ दखल घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास वाघमोडे यांच्याशी संपर्क साधून अंधश्रद्धाची विषयाची माहिती दिली.यावेळेस पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास वाघमोडे फर्दापूर व कर्मचारी यांनी रात्रीच्यावेळी सावळदबारा गावात स्वतः सहायक पोलीस निरीक्षक वाघमोडे साहेब यांनी अमावस्या ची रात्र व इतर दिवशी रात्री बारा ते सकाळी पाच वाजेपर्यंत गावात गस्त घालून जनजागृती करून ग्रामस्थांना धीर दिला.त्यानंतर पुन्हा प्रा.जीवन कोलते यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती याच्याशी संपर्क साधून हरिहर मंदिर येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती याचां जनजागृती विषयक कार्यक्रम घडहून आणला . दृढ रुढी परंपरा व अंधश्रद्धा याबाबत याविषयी भाऊ पठाडे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा अध्यक्ष औरंगाबाद, प्रा.शिवाजी वाठोरे,सुनील चौतमल,प्रशांत कांबळे, कृष्णा पाटील, जगदीश सोनवणे यांनी ग्रामस्थांना पटनाट्य व जादूचे प्रयोग सादर केले होते यामध्ये चमत्कार व त्यामागील विज्ञान या नारी शक्ती उपक्रमांतर्गत कार्यक्रम संपन्न झाला समाजातील अंधश्रद्धा दृढ रुढी व परंपरा यामुळे होणारा जीवितहानी व नरबळी यासारख्या प्रथा मोडीत काढण्यासाठी समाजात जनजागृती व्हावी व समाज गुण्यागोविंदाने व धार्मिक रितीरिवाजाप्रमाणे वागावे यासाठी आयोजित केलेल्या भाऊ पठाडे जिल्हाध्यक्ष यांनी सांगितले.तेव्हा पासून आता संपूर्ण गावामध्ये शांततेचे वातावरण तयार झाले आहे.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे व सपोनि देवीदास वाघमोडे फर्दापूर यांनी गावाला खूप सहकार्य केले तसेच गावातील जय भवानी नवतरुण मित्र मंडळ,जय सरस्वती मित्र मंडळ व जय बजरंग गणेश मंडळ यांच्या कार्यकर्ते यांनी सुदा आम्हला खूप मदत केली त्यांचे मी गावकऱ्यांच्या वतीने आभार मानतो. आता गावातील सर्व घरांमध्ये यंदाचा दिवाळी उत्सव शांततेत व आनंदात हा सण मोठ्या उत्साहात साजरा करावा कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला बळी पडू नका असे आवाहन प्रा.जीवन कोलते(सामाजिक कार्यकर्ते)यांनी केले आहे.