सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत शेतकरी आप्पा गोंडबे तात्काळ नुकसान भरपाई देण्याची;दिनेश चोपडे यांची मागणी सोयगाव तालुक्यातील सावळदबारा,फर्दापूर जिल्हा परिषद सर्कलमध्ये सावळदबारा परिसरात पशुसंवर्धन विभागाच्या वतीने लसीकरण मोहीम राबविली जात असली तरी लम्पी स्किन आजाराचा धोका अजूनही टळला नसल्याचे सावळदबारा गावात दिसून आले आहे.शेतकरी आप्पा नामदेव गोंडबे यांच्या बैलाला लम्पी आजाराची लागण दि.३०/९/२२ रोजी झाली होती.सावळदबारा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ शिपाई कागंले यांनी योग्य तो औषधी उपचार करून हि अल्पभूधारक शेतकरी आप्पा गोंडबे याचां बैल दि.१०/१०/२२ सकाळी दगावला यामुळे शेतकरी व पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाल्याचे आहे. सावळदबारा पशुवैद्यकीय केंद्रा अंतर्गत डॉ, कांगले यांनी पंचनामा केला यावेळी उपसरपंच मो.आरिफ मो.लुखमान, पो.पा.विलास कुल्ले, पत्रकार विजय कुल्ले, प्रकाश चोपडे, भास्कर कोते, भास्कर पाटील, प्रमोद साखरे,राजेंद्र भडजी महाराज उपस्थित होते. पंचनामा करून जेसीबीच्या सहाय्याने खोल खड्डा खोदून त्या खड्ड्यात बैलाचा शेवटचा अंतिम संस्कार करण्यात आला सावळदबारा परिसरात आतापर्यंत नेमक्या किती गुरांना लम्पी स्किन आजाराची लागण झाली आहे.याचा अकडा मात्र समोर आला नाही.सावळदबारा येथे बैलाचा दुसरा बळी गेला आहे.वैद्यकीय अधिकारी डॉ यांनी लक्ष द्यावे आणि शेतकरी आप्पा नामदेव गोंडबे यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष दिनेश चोपडे ता सोयगाव यांनी केली आहे.