सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा – कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकार्यांना दिला दम सोयगाव शहरात व तालुक्यात सुरू असलेले तसेच प्रलंबित कामे निर्धारित वेळेत पूर्ण करा. मंजूर कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून नवीन कामांचे प्रस्ताव तातडीने सादर करा अशा सूचना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सोयगाव येथील आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या. सर्वच विकास कामे गुणवत्तापूर्ण करावेत, कुठल्याही परिस्थितीत निकृष्ट दर्जाचे काम खपवून घेणार नाही असा इशारा ना. अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिला दम कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दि.७/१०/२२ रोजी येथील तहसील कार्यालयात शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली. याप्रसंगी ना. अब्दुल सत्तार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना आदेशीत केले.यावेळी उपविभागीय अधिकारी संदीप पाटील, तहसीलदार रमेश जसवंत, शिंदे गटाचे तालुकाप्रमुख प्रभाकर काळे, नगराध्यक्षा श्रीमती आशाबी तडवी, मुख्याधिकारी सय्यद रफिक, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, न.प.तील गटनेता अक्षय काळे, शिंदे गटाचे शहरप्रमुख संतोष बोडखे, नगरसेवक हर्षल काळे, भगवान जोहरे, लतिफ शहा अशोक खेडकर,गजानन कुडके,माजी जि.प. सदस्य गोपीचंद जाधव, सोयगाव पोलीस ठाण्याचे सपोनि अनमोल केदार, फर्दापूर पोलीस ठाण्याचे एपीआय देविदास वाघमोडे, किशोर मापारी, राजू दुतोंडे, कदीर शहा, राजेंद्र घनघाव, विष्णू इंगळे तालुका कृषी अधिकारी श्री. वाघ आदिंसह सर्व विभागनिहाय शासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.यावेळी ना. अब्दुल सत्तार यांनी सोयगाव येथे कृषी भवन उभारण्यासाठी जागेची निवड करण्याच्या सूचना दिल्या. तहसीलदार यांनी स्वतः लक्ष घालून सोयगाव फर्दापूर येथे पोलीस कॉलनी, शासकीय कर्मचारी निवास्थानसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, भीमपार्क चे काम सुरू करावे यासाठी तातडीने समिती स्थापन करने, पाऊस उघडताच पानंद रस्त्यांची कामे सुरू करणे, शेतकऱ्यांना जळालेली रोहित्रे विना विलंब कसे देता येईल यासाठी नियोजन करणे, रस्त्यांची कामे करणाऱ्या एजन्सीने रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण कराव्यात , यासह 100 खाटांच्या रुग्णालयाचे काम सुरू करणे, सोयगाव येथील प्रशासकीय इमारतच्या कामाला सुरुवात करणे, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवर प्रवेशद्वारासह संरक्षण भिंत बांधकाम करणे तसेच येथे 5 हजार स्क्वेअर फूटाचे गोडाऊन करणे यासाठी प्रस्ताव सादर करणे, सोयगाव साठी वॉटरग्रीड योजनेला मंजुरी मिळालेली असून सोयगाव सह इतर गावांना मुबलक पाणी पुरवठा कसा होईल यासाठी प्रभावी नियोजन करण्याच्या सूचना मंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.अशी माहिती जि.प.सदस्य गोपीचंद जाधव यांनी उपसंपादक गोकुळसिंग राजपूत याच्याशी बोलताना सांगितले.